पुणे : गेले महिनाभर पुणे शहरात दररोज सरासरी १५० ते २५० नव्या कोरोना बाधितांची संख्या नोंदवण्यात येत आहे. तर, कोरोना मुक्तांचा आकडा देखील नव्या बाधितांपेक्षा अधिक होता. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर पुणे शहरात निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली. तरीदेखील कोरोना चाचण्यांचे प्रमाण हे अधिक राहावे यासाठी प्रशासन काम करत आहे. दरम्यान, सण, उत्सवांचा काळ हा सुरु होत असतानाच आता पुणेकरांनी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे.
पुणे शहरात आज नव्याने २५७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ९४ हजार ७२४ इतकी झाली आहे. तर १६३ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ८३ हजार ५०६ झाली आहे.
दरम्यान, आज एकाच दिवसात ९ हजार ६८५ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता ३१ लाख ०१ हजार ७६५ इतकी झाली आहे. शहरात सध्या उपचार घेणाऱ्या २ हजार ३११ रुग्णांपैकी २०६ रुग्ण गंभीर तर २८२ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. तर, पुणे महापालिका हद्दीत नव्याने ५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ८ हजार ९०७ इतकी झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आता भाजप ऍक्शन मोडमध्ये; अनिल परब यांच्याविरोधात याचिका दाखल करण्याचं काम सुरु
- ‘भुजबळ, धनंजय मुंडे हे ओबीसी आरक्षणाबाबत तोंडाला डिंक लावून गप्प बसतात’
- जनताच कुंभकर्णासारखी झोपलीये, मी एकटाच कधीपर्यंत लढू? – अण्णा हजारे
- मोठी बातमी : राज्यातील आणखी एका जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश
- आत्मनिर्भरता : देशाची सुरक्षा अधिक ‘भारतीय’ होण्यासाठी डीआयएटी प्रयत्नशील – संरक्षण मंत्री
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
