Share

रयत शिक्षण संस्थेकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 2 कोटी 36 लाखांचा निधी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात पुन्हा कोरोनाची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हा संभाव्य धोका टाळण्यासाठी राज्य सरकार जोरदार प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर रयत शिक्षण संस्थेकडून मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-19) साठी 2 कोटी 36 लाख 84 हजार 757 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी वर्षा निवासस्थान येथे सुपूर्द केला.

रयत शिक्षण संस्थेच्या राज्यातील विविध शाळा, महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर सेवकांनी या निधीसाठी एक दिवसाचे वेतनाचे योगदान दिले आहे. या निधीचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९ साठी देण्यात आला आहे. यावेळी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते.

दरम्यान, या भेटीत नेमक्या कोणत्या विषावर चर्चा झाली याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही मात्र, राज्यपाल नियुक्त 12 विधानपरिषद सदस्यांचा प्रश्न या मुद्द्यासह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याची शक्यता आहे. राज्यातील पूर परिस्थिती, कोरोना आढावा, ओबीसी राजकीय आरक्षण, राज्यात महाविकास आघाडीतील नेत्यांवर ईडीचे धाडसत्र आणि महाविकास आघाडीतले समन्वयाचे मुद्दे अशा विषयांवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!