Share

कीटक नाशकाच्या फवारणीमुळे 18 जणांचा मृत्यू

Published On: 

संदेश कान्हु, (जिल्हा प्रतिनिधी) यवतमाळ.जिल्ह्यात कापूसाच्या उभ्यापिकावर बोडअळी ,गुलाबी बोडअळी, मलीबगचे प्रचन्ड हल्ला रोखण्यासाठी प्रोफेक्स सुपर वा पोलो या सारख्या अतिविषारी ‘कीटकनाशकाच्या फवारणीमुळे या पंधरवाड्यात १६ शेतमजूर व अल्प भुधारक शेतकऱ्यांच्या मृत्यू झाला असून ६००च्या वर लोकांना विषबाधा झाली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे

यवतमाळ जिल्ह्यामध्ये उमरखेड पुसद, आर्णी ,दिग्रस ,दारव्हा ,यवतमाळ ,राळेगाव , कळबं ,मारेगाव, केळापुर व वणी या ठिकाणी सुमारे ७५० रुग्णामध्ये आदीवासी शेतमजूर व अल्प भुधारक शेतकऱ्यांच्या समावेश असुन आतापर्यंत १७ पेक्षा जास्त प्रकरणांमध्ये किटकनाशची बाधा झालेले निरपधार जीव गमावले आहेत. यामध्ये जीवगांवचे शंकरराव आगलावे ,आमलोनचे दत्ता टेकाम, शेंदूरघानींचे दीपक मडावी नायगांव गावचे दशरथ चव्हाण,कळंब शहराचे देविदास माडीवी, जामनी गावचे कैलाश पेंदोर ,कळंब गावचे आयुब शेख, कळंबचे अनिल चव्हाण, घाटंजी गावाचे रमेश चिरावार,उचेगाव गावचे रवी राठोड,पहापळचे विठ्ठलराव पेरकेवार टेम्भीचे विलासभाऊ मडावी ,मारेगावचे वसंतराव सिडाम, कालेगाव मारोतराव पिंपळकर ,घोडधरा गावातील दिवाकर घोसी,टाकळी गावचे शंकर कदम ,मानोलीचा बंडूभाऊ सोनुर्ले राळेगावचे सावरगावचे गजाननराव फुलमाळी यांचा समावेश आहे .

 या मृत्यू तांडवाची सारी जबाबदारी शेतमजूर व अल्प भुधारक शेतकऱ्यांच्या डोक्यावर उच्चसमितीच्या अहवालाच्या नांवावर मांडण्याचा घाणेरडा व खोटारडा प्रकार आपण हाणून पाडणार असुन या मृत्युची संपुर्ण जबाबदारी कृषी व आरोग्य विभागाची असल्याने यांच्यावरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सरकारी नौकरीमधून हकालपट्टी करण्याची मागणीच कै वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे .

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!