🕒 1 min read
मुंबई : पॅन कार्ड-आधार कार्ड जोडणीसाठी आयकर विभागानं आजवर अनेकदा मुदत तारखा वाढवून दिल्या आहेत. मात्र, आता 31 मार्चपर्यंत आधार कार्ड आणि पॅन कार्ड यांची जोडणी न केल्यास पॅन कार्ड रद्द केला जाणार आहे. दिलीय. हिंदुस्तान टाइम्सच्या बातमीनुसार, या कारवाईमुळे जवळपास 18 कोटी पॅनकार्ड रद्द होऊ शकतात.
उत्पन्न कमी असूनही जे लोक भरमसाठ खर्च करत आहेत. तसंच, करही भरत नाहीत, अशा लोकांच्या व्यवहाराची चौकशी आयकर विभागाकडून करण्यात येण्याची शक्यता आहे. जून 2020 पर्यंत देशात 50.95 कोटी पॅन कार्डधारक होते. त्यापैकी 6.48 कोटी पॅन कार्डधारकांनीच आयटी रिटर्न फाईल केलं असून, त्यातील दीड कोटी जणांची आयकर भरलं आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवडकरांसाठीची पीएमपीची बससेवा तूर्तास नाहीच! जाहीर केली ‘हि’ नवी तारीख
कर सल्लागार संस्था टॅक्समॅनचे उपमहाव्यवस्थापक नवीन वाधवा यांनी सांगितले की, पॅन क्रमांक आधारशी जोडला नसेल, तर एकापेक्षा अधिक पॅन कार्ड काढणे शक्य आहे; पण आधारशी जोडणी झाल्यानंतर दुसरे पॅनकार्ड काढले जाऊ शकत नाही. आधारशी न जोडले गेलेले पॅनकार्ड त्यामुळेच करचोरीचा मार्ग सुकर करतात.
राज्यात तब्बल १४ हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित, तर कोरोनामुक्तांचे प्रमाण झाले ‘इतके’!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
