Share

परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगासाठी १३३ कोटी आराखड्यास मंजुरी

Published On: 

बीड: महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगापैकी बीड जिल्ह्यातील परळी येथील  तिर्थक्षेत्र वैद्यनाथ ज्योतिर्लिंग विकासासाठी १३३ कोटी आराखड्यास मंजुरी मिळाली आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाने या आराखड्यास मंजुरी दिली आहे. या निधीचा वापर करुन ज्योतिर्लिंग तिर्थक्षेत्राचा कायापालट करण्यात येणार आहे.

नगराध्यक्षा सरोजिनी हालगे यांच्या हस्ते विकास आराखड्याच्या डिजिटल चित्रफितीचे  सादरीकरण करण्यात आले. या विकास आराखड्यातंर्गत ७७ प्रकारची विकास व सुशोभीकरणाची कामे करण्यात येणार आहेत. ७७ प्रकारची विकास व सुशोभीकरणाची कामे करण्यात येणार आहेत.

यात प्रतीक्षागृह, धर्मशाळा, सुलभ शौचालय संख्या वाढवणे बाबींचा समावेश आहे. तसेच दर्शन बारीमधील  मेरू पर्वतावर कॉटेज, उपाहारगृह, दगडी फरशी, संरक्षण भिंत, वाहनतळ, हरिहर तीर्थाचा विकास, पेव्हर ब्लॉकिंग, आरओ मशीनसह पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, डोंगरतुकाई परिसरात सभामंडप, धर्मशाळा, उद्यान, वाहनतळ, सिमेंट रस्ता, भुयारी मार्ग तसेच वैद्यनाथ मंदिर परिसरात पोलिसांकरिता टेहळणी मनोरे, माहिती फलक, प्रतीक्षालय, पालखी मार्गाचा विकास, त्रिशूल व डमरू यासह डिजिटल लॉकरपासून ते सोलार लाइट उभारणी अशी विविध बाबींचा समावेश विकास आराखड्यात करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!