Share

Lok Sabha : शिंदे गटात सहभागी झालेल्या १२ खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली

Published On: 

🕒 1 min read

Shivsena। मुंबई : शिवसेनेला लागलेली गळती आता थांबताना दिसत नाहीये. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दररोज अडचणी वाढताना दिसत आहेत. आधी एकनाथ शिंदे यांनी बंड करून 40 आमदारांना वेगळं केलं. त्यामुळे शिवसेनेत प्रचंड खळबळ उडाली. आता शिवसेनेचे १२ खासदार फुटण्याच्या मार्गावर होते. आज (मंगळवार) लोकसभेतील शिवसेनेच्या १९ पैकी किमान १२ खासदार स्वतंत्र गट तयार करण्याची शक्यता आहे.

या संदर्भात खासदार सभापतींना औपचारिक पत्र सादर करतील. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला (शिवसेना) हा मोठा झटका मानल्या जात आहे. यापूर्वी या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. शिवसेनेच्या १२ खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. तसा फोटो समोर आला आहे. एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर लागलीच लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन गटनेता बदलण्याची मागणी केली आहे.

याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचा विश्वासही या खासदारांनी व्यक्त केला आहे. स्वतंत्र गटासंदर्भात देखील लवकरच निर्णय घेण्याची मागणी देखील लवकरच होईल असा त्यांना विश्वास आहे. यासंदर्भात 12 खासदारांनी पत्र लोकसभा अध्यक्षांना एक पत्र दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर खासदारांनी पुढची रणनिती ठरविल्याचे सांगण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!