Share

दोन दिवसात शंभर तपासण्या, औरंगाबादकरांना मोठा दिलासा

Published On: 

औरंगाबाद : शहरातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन शहरात कोरोना तपासणीला वेग आला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात आज १०२ रुग्णांची तपासणी मोहीम पार पडली. काल आणि आजचे मिळून ८९ रूग्णांची कोरोना तपासणी निगेटिव्ह आली. हा मोठा दिलासा औरंगाबादकरांना मिळाला आहे. तपासणी नेगिटिव्ह आलेल्याना आज आवश्यक औषधींचा सल्ला देऊन घरी पाठवण्यात आल्याची रुग्णालयाचे डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली.

कोरोनामुळे औरंगाबाद जिल्ह्यात २८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यापैकी दोन रुग्ण पुर्णतः बरे होऊन घरी परतले, तर दोघा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात २२, तर घाटी व खासगी रुग्णालयात प्रत्येकी एका रुग्णावर उपचार चालू आहेत.

मिनी घाटीत आज तपासण्यात आलेल्यांपैकी ५२ जणांचे स्वाब शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय (घाटी) येथे पाठवण्यात आले आहेत. अजूनही १९ अहवाल येणे प्रतीक्षेत आहे. ५४ जणांना रुग्णालयात भरती करून डॉक्टरांच्या निगराणी खाली ठेवण्यात आले आहे. तर २३ जणांना होम क्वारेंटाइन राहण्याचा सल्ला दिलेला आहे, असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!