🕒 1 min read
पुणे : वादग्रस्त आयपीएस अधिकारी व मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या दर महिन्याला १०० कोटी वसुलीच्या कथित आरोपामुळे राज्याच्या राजकारणात तसेच पोलीस दलात देखील खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सक्तवसुली संचालनालय (ईडी) आर्थिक व्यवहाराची पाळेमुळे खोदून काढत आहे. या प्रकरणात साक्षीदार असलेल्या पोलीस उपायुक्त राजू भुजबळ व साहाय्यक आयुक्त संजय पाटील यांच्या मूळगावातील घरांची झडती घेतली आहे.
भुजबळ यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर व पाटील यांच्या पुण्यातील कोथरूड येथील घराची तपासणी करण्यात आली. त्यांच्या नातेवाइकांच्या नावे असलेल्या मालमत्तेबद्दलचा तपशील जाणून घेण्यात आला. दोन पथकांमार्फत ही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, परमबीर सिंह यांनी आरोपादाखल उपायुक्त भुजबळ व साहाय्यक आयुक्त पाटील यांच्या व्हाॅट्सॲप चॅटचे दाखले दिले होते. मात्र चौकशीत दोघांनी ते आरोप फेटाळले असून, चुकीच्या संदर्भात ते सादर करण्यात आल्याचा जबाब ईडीला दिला असल्याचे समजते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘एसटी’चे प्रशिक्षण पूर्ण मात्र सेवेत घेण्यास टाळाटाळ; उमेदवारांमध्ये निराशेचे वातावरण!
- मंत्रिमंडळ बैठकीतच अस्वस्थ वाटू लागल्याने मंत्री जयंत पाटील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
- राजेंद्र जंजाळ यांच्यावर खोटे आरोप लावणे ‘भाजप’ने बंद करावे, अन्यथा प्रत्युत्तर देण्यास युवासेना तयार!
- ‘एकीकडे महापुरात उध्वस्त झालेल्या कुटूंबांची मुस्कटदाबी अन् दुसरीकडे मांडीला मांडी लावून दोन घास…’
- शिखर धवनने दुसर्या टी -20 सामन्यात कोहलीचा विक्रम मोडत घेतली अव्वल स्थानी झेप


