Share

राज्यात एकाच दिवशी बरे झाले १० हजार ८५४ कोरोना रुग्ण…

Published On: 

मुंबई : राज्यात गुरवारी देखील १० हजार ८५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६५.९४ टक्के एवढे आहे. आतापर्यंत राज्यभरात ३ लाख १६ हजार ३७५ रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या १ लाख ४६ हजार ३०५ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

गुरवारी निदान झालेले ११,५१४ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३१६ मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-९१० (५७), ठाणे- २०९ (११), ठाणे मनपा-२६६ (२७),नवी मुंबई मनपा-३८४ (२), कल्याण डोंबिवली मनपा-२४३ (७),उल्हासनगर मनपा-२४ (३), भिवंडी निजामपूर मनपा-२९ (६) , मीरा भाईंदर मनपा-१५७,पालघर-७६ (४), वसई-विरार मनपा-१८६ (६), रायगड-२५९ (४), पनवेल मनपा-१७० (१), नाशिक-१८७(२),नाशिक मनपा-६०२ (११), मालेगाव मनपा-२६, अहमदनगर-२४९ (५),अहमदनगर मनपा-२८४, धुळे-५७ (१), धुळे मनपा-१२९ (१), जळगाव-३४३ (१३), जळगाव मनपा-१३७, नंदूरबार-४९ (१), पुणे- ५९४ (१२), पुणे मनपा-१५१२ (३१), पिंपरी चिंचवड मनपा-९८५ (१९), सोलापूर-२०५ (१४), सोलापूर मनपा-६७ (१), सातारा-२०५ (२), कोल्हापूर-४२१ (११), कोल्हापूर मनपा-१४३ (२), सांगली-७५ (३), सांगली मिरज कुपवाड मनपा-२५४ (२), सिंधुदूर्ग-५, रत्नागिरी-५७ (१), औरंगाबाद-१८५ (२), औरंगाबाद मनपा-८६ (५), जालना-६६, हिंगोली-१४, परभणी-१४ (४), परभणी मनपा-१८ (३), लातूर-१३२ (२), लातूर मनपा-८० (४), उस्मानाबाद-१२६, बीड-१०९ , नांदेड-६६ (३), नांदेड मनपा-४९ (२),अकोला-४१ (१), अकोला मनपा-३३, अमरावती-६८ (२), अमरावती मनपा-७३ (५), यवतमाळ-४४ (२), बुलढाणा-८२ (३), वाशिम-२३, नागपूर-२०६ (६), नागपूर मनपा-३३१ (१२), वर्धा-५, भंडारा- ५३, गोंदिया-२३, चंद्रपूर-५२, चंद्रपूर मनपा-१७, गडचिरोली-१३, इतर राज्य १५.

बाबर तुमचा कोण लागतो? शिवसेनेने ओवैसींवर डागली तोफ

गुरवारपर्यंत पाठविण्यात आलेल्या २४ लाख ८७ हजार ९९० नमुन्यांपैकी ४ लाख ७९ हजार ७७९ नमुने पॉझिटिव्ह (१९.२८ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ७६ हजार ३३२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ७६८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३१६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५० टक्के एवढा आहे.

मोठी बातमी: मंत्री अशोक चव्हाण राज्यपालांच्या भेटीला, तर सोनिया गांधी यांची देखील काँग्रेस नेते घेणार भेट!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!