Share

बाबर तुमचा कोण लागतो? शिवसेनेने ओवैसींवर डागली तोफ

Published On: 

मुंबई: करोडो हिंदूंसह भारतीयांचे अनेक शतकांचे असलेले स्वप्न आता पूर्ण होत आहे. मागील वर्षाच्या अखेर राम जन्मभूमीबाबत निकाल लागल्या नंतर २ दिवसांपूर्वी ५ ऑगस्टला राम मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. कोरोनाचे सावट लक्षात घेता मोजक्याच निमंत्रितांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला असला तरी जगभरातील रामभक्तांनी हा सोहळा असेल त्या ठिकाणाहून पाहिला.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हा वाद संपला असून मुस्लिम पक्षकार, वकील यांना देखील एकतेचे प्रतिक म्हणून या सोहळ्यात बोलावण्यात आले होते, तर त्यांनी देखील राम मंदिर निर्माणाचे स्वागत करत उपस्थिती लावली होती. मात्र, अजूनही काही मुस्लिम नेते यावरून द्वाशाचे राजकारण करताना दिसत आहेत. यापैकीच एक असदुद्दीन ओवैसी आहेत. त्यांनी ट्विटरवर गरळ ओकली असून आता शिवसेनेने सामानातुन त्यांना चांगलेच प्रत्युत्तर देत समाचार घेतला आहे.

मोठी बातमी: मंत्री अशोक चव्हाण राज्यपालांच्या भेटीला, तर सोनिया गांधी यांची देखील काँग्रेस नेते घेणार भेट!

सामना अग्रलेखातील काही महत्वाचे मुद्दे-

असदुद्दीन ओवेसी म्हणतात , ‘ अयोध्येत पंतप्रधान मोदी भावनिक झाले . मिस्टर पंतप्रधान, मीसुद्धा तितकाच भावनिक झालो आहे. कारण मी एकात्मतेवर विश्वास ठेवतो. मी भावनिक झालो, कारण त्या ठिकाणी 450 वर्षे एक मशीद उभी होती.” ओवेसी काय म्हणतात ते ढोंगच आहे. कारण पाच हजार वर्षांपासून तेथे एक राममंदिर होते. ते तोफा लावून पाडले गेले व तेथे मशीद उभी केली गेली! त्यामुळे नक्की कोणी भावनिक व्हायचे? जे पाप तोफांनी उभे केले ते पाप शिवसैनिकांनी हातोड्यांनी उद्ध्वस्त केले. लोकभावनेचा हा विजयच आहे! मिस्टर ओवेसी, आता रडणे वगैरे बंद करा.

मुंबई कि तुंबई? मुंबईत नालेसफाई नाही तर हातसफाई होते: देवेंद्र फडणवीस

काही विघ्नसंतोषी राजकारण्यांच्या पोटदुखीस अंत नाही. अर्थात यात नेहमीप्रमाणे असदुद्दीन ओवेसी हेच आघाडीवर आहेत. श्री. ओवेसी म्हणतात, ”बाबर जिंदा है। जिंदा रहेगा।” ओवेसी यांनी ही जी बांग दिली ते त्यांचे ‘स्वगत’ आहे. या स्वगताचे देशातील मुसलमान बांधवांनी स्वागत केले नाही. सर्वोच्च न्यायालयाचा राममंदिराबाबतचा निर्णय देशातील मुसलमानांनी स्वीकारला आहे. ओवेसी म्हणतात, ”बाबर जिवंत आहे.” आम्ही विचारतो, ”कोण हा बाबर? हा बाबर तुमचा कोण लागतो?’

चीनशी सामनाचं काय, तर नाव घेण्याचे देखील मोदींमध्ये धाडस नाही; राहुल गांधींचे मोदींच्या हिम्मतीलाच आव्हान

‘ बाबर या देशात दोन वेळा मेला. 450 वर्षांपूर्वी एकदा मेला. दुसऱ्य़ांदा मेला तो 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत रामभक्तांनी बाबरीचे घुमट तोडून उद्ध्वस्त केले तेव्हा. आता तर बाबरीचे नामोनिशाणही मिटले व भूमिपूजन सोहळ्यामुळे अयोध्येतील सुतकही गेले. बाबर आता हिंदुस्थानातच काय, तर जगात कोठेच जिवंत नाही. ज्या उझबेकिस्तान नामक प्रांतातून तो आला त्या देशात तरी तो किती जिवंत आहे याचे भान ओवेसींसारख्या उच्चशिक्षित मुसलमान पुढाऱ्य़ांनी ठेवले पाहिजे.

बाबर हा हिंदुस्थानात घुसलेला आक्रमक होता. हिंदुस्थानातील मोगल साम्राज्याचा संस्थापक बाबर होता. त्याने आपले आत्मचरित्र लिहिले आहे. त्यात ‘हिंदू’ व ‘हिंदुस्थान’ या शब्दांचा त्याने वापर केला आहे. मोगलांच्या आक्रमणात हिंदूंचे स्वामित्व काही काळ लयास गेले, पण म्हणून त्यांचे अस्तित्वच संपले असे होत नाही. बाबराने रामजन्मभूमीचा विध्वंस केला व तेथे मशीद उभारली हे ओवेसींसारखे नेते का स्वीकारीत नाहीत? ,  असा खरमरीत सवाल देखील केला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!