Share

१ टक्का सवलत आणि याला योजना म्हणणे ही महिलांची फसवणूक

Published On: 

मुंबई : अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२१-२२ आज विधानसभेत सादर केला. यावेळी त्यांनी विविध मोठ्या घोषणा केल्या. यातील महत्त्वाचा निर्णय म्हणजे महिलांच्या नावाने घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात सवलत मिळणार आहे. १ एप्रिल २०२१ पासून याची अंमलबजावणी होणार असल्याचे ते म्हणाले.

या योजनेनुसार राज्यात कोणतेही घर विकत घेतले जाईल तेव्हा त्या घराची नोंदणी महिलेच्या नावावर झाल्यास मुद्रांक शुल्कात १% सवलत दिली जाईल. १ एप्रिल २०२१ पासून या योजनेची अंमलबजावणी होईल, असे अजित पवार यांनी सांगितले. आरोग्य संस्थांचे बांधकाम व श्रेणीवर्धनासाठी ७ हजार ५०० कोटी रुपये किमतीचा प्रकल्प येत्या चार वर्षांत पूर्ण करण्यात येणार असल्याचंही अजित पवार यांनी सांगितल आहे.

परंतु सरकार ने घेतलेल्या या निर्णयावर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केलेली आहे. त्या म्हणाल्या कि,’सरकारच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी केलेल्या उपाययोजना म्हणजे राज्यातील महिला वर्गाची शुद्ध फसवणूक आहे. महिलेच्या नावावर घर खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात १% सवलत मिळणार अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली मुळात मुद्रांक शुल्कात (स्टॅम्प ड्युटी रेजिस्ट्रेशन) मध्ये केवळ १ टक्का सवलत ही अत्यंत जुजबी घोषणा आहे या ‘निर्णया’चा उल्लेख ‘योजना’ असा करून सरकार महिलांची जनतेची फसवणूक करत आहे.’ अशी टीका त्यांनी केलेली आहे.

तसेच ‘आज फक्त महिलांच्या नावाने काहीतरी केल्यासारखे दाखवयाचे म्हणून अर्थसंकल्पात या घोषणेचा समावेश करण्यात आला का ? जर महिलांच्या नावावर घर खरेदी वाढावी असे सरकारला वाटत असेल तर त्यांनी आर्थिक सबसिडीविषयी तरतुद करायला हवी होती. त्याकरिता वेगळी आर्थिक तरतूद सरकारने केलेली नाही केवळ एक निर्णय करून त्याला’योजना’म्हणता ही शुद्ध फसवणूक आहे.

ST बस प्रवास विद्यार्थिनींना मोफतची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली परंतु ही नवी योजना नाही २दिवसांपूर्वी सरकारचा आर्थिक पाहणी अहवाल आला त्यात पान क्रमांक २०० वर ‘अहिल्यादेवी होळकर योजना’म्हणून ही सवलत उपलब्ध असल्याची माहिती आहे. मग आपण नव्याने ही घोषणा केल्याचे चित्र सरकार का निर्माण करीत आहे. याला फसवणूक का म्हणू नये ? असा घणाघाती प्रश्न भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी सरकारला विचारला आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!