Share

१ कोरोना पॉझीटीव्ह व्यक्ती सुमारे ४०० व्यक्तींना बाधित करु शकते: आयुक्त डॉ. म्हैसेकर

Published On: 

पुणे, दि.9 : पुणे शहरात कोविड-19/ कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ही वस्तुस्थिती असली तरी तपासणीसाठी घेण्यात आलेल्या एकूण सॅम्पल पैकी साधारण ३.९ टक्के केसेस पॉझीटीव्ह तर साधारण ८९ टक्के केसेस निगेटीव्ह आहेत. पुण्यात कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे. मृत पावलेल्या एकूण व्यक्तींपैकी साधारणपणे ८० टक्के व्यक्ती ज्येष्ठ नागरिक आहेत. शिवाय यातील बहुतांशी व्यक्तींना मधुमेह व उच्च रक्तदाब हा विकार दिसून आला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी आज दिली.

५ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत १ हजार २३५ सॅम्पल घेण्यात आले होते. यापैकी ४८ सॅम्पल पॉझिटिव्ह तर १ हजार ११० सॅम्पल निगेटीव्ह आले आहेत. म्हणजे तपासणी करण्यात आलेल्या एकूण सॅम्पलपैकी साधारण ३.९ टक्के सॅम्पल पॉझीटीव्ह तर ८९ टक्के सॅम्पल निगेटीव्ह आले आहेत.

मार्च महिन्याच्या तुलनेत १ एप्रिल ते ८ एप्रिल या दरम्यान साधारणपणे चार पट जास्त सॅम्पलची तपासणी करण्यात आली आहे. या कालावधीत पॉझीटीव्ह केसेसची संख्या ही झपाटयाने वाढल्याचे दिसून येते. तपासणी दरम्यान पॉझीटीव्ह केसेस जास्त आढळून आल्यामुळे त्यांच्यावर वेळेत उपचार करणे शक्य झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी चिंता करु नये असंही डॉ म्हैसेकर म्हणाले.

कोरोना पॉझीटीव्ह १ व्यक्ती सुमारे ४०० व्यक्तींना बाधित करु शकते. बाधित व्यक्तीने मास्क वापरला तर सुमारे २००  व्यक्ती बाधित होण्याइतके प्रमाण कमी होते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने मास्कचा वापर करावा, असे आवाहन डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!