टीम महाराष्ट्र देशा : हर्सूल येथील हरसिद्धी माता यात्रेच्या निमित्ताने नगरसेवक तथा पहेलवान पुनम बमने यांनी आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेत बुधवारी महाराष्ट्र केसरी बाला रफीक शेख आणि पंजाब केसरी हिमा चिमा पेहलवान यांच्यात संध्याकाळी उशिरा सुरु झालेल्या दंगलमध्ये सर्वात मानाची पाच लाख रुपयांची कुस्ती शेख यांनी चिमा याला अवघ्या २५ सेकंदात आसमंत दाखवून पाच लाख रुपयांची मानाची कुस्तीचा मानकरी झाला.
गावाची कुलदैवत असलेल्या हरसिद्धी माता यात्रेत सर्वांना आवड्या कुस्तीचा कार्यक्रम ठेवला होता. सकाळी तगातराव दहा वाजता मारुती मंदिरापासून निघून देवी मातेच्या मंदिराजवळ येऊन संपला. त्यानंतर कुस्ती सुरु झाल्यानंतर सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत रंगत जाणाऱ्या दंगलीने सर्वांच्या अंगावरचे शहारे उभे राहिले होते.
मात्र शेवटच्या मानाच्या कुस्तीत अवघ्यात २५ सेकंदात आसमंत दाखवून उपस्थित भाविक, कुस्ती प्रेमींच्या डोळ्यांचे पारने फेडले. सकाळी शंभर रुपये पासून सुरु झालेली कुस्ती पाच लाख रुपयांवर येऊन संपली. यात राज्यासह परराज्यातूनही मोठ्या प्रमाणात कुस्तीपटू आले होते. शेवटची कुस्ती विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पूनम बमने यांच्या हस्ते शेवटची कुस्ती लावली.
त्यानंतर अवघ्या काही सेकंदात बाला शेख यांनी दुहेरी पट देत चिमा याल थेट असमंत दाखवून धूळ चारली. पंच कमिटीत पुनम बमने, हरिदास हरणे, हरिदास म्हस्के, अर्जुन औताडे, नवनाथ औताडे, सोमनाथ वाणी, रऊफ शेख, संजय भगुरे, कैलास वाणी, माधू वाणी, सोमनाथ रोठोड, मनोज जाधव, रमेश म्हस्के, साईनाथ हरणे, रंगणात हरणे, स्वामी दुबे, घनश्याम दुबे, प्रकाश औताडे, दादासाहेब औताडे, पूनम गंगावणे आदींची उपस्थिती होती.
महत्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1194949759414370307?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1194947731187359746?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

