Share

नागपुरात धोका वाढला, आणखी 4 जण कोरोनाबाधित : रुग्णांचा संबध सतरंजीपुराशी

Published On: 

नागपूर : नागपूरमध्ये आणखी 4 कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून यामध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे चारही रुग्ण सतरंजीपुरा येथे करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आले होते.  सध्या या 4ही कोरोनाबाधित रुग्णांना क्वारांटाईन करण्यात आले आहे.

नागपुरातील कोरोनाबाधितांचा आकडा सध्या ७७ वर पोहोचला आहे.  त्यात आता आणखी 4 जणांची भर पडली आहे. सर्वांना क्वारांटाईन ठेवण्यात आलं आहे. यामधील तिघांना आमदार निवासात क्वारांटाईन ठेवण्यात आलं असून एकाला लोणारा येथे क्वारांटाईन ठेवण्यात आलेलं आहे. नागपुरात आतापर्यंत १२ जणांना उपचार करुन घरी सोडण्यात आलेलं आहे.

दरम्यान नागपूरमधील सतरंजी भागात वास्तव्यास असणाऱ्या ६८ वर्षीय व्यक्तीचा करोनामुळे ५ एप्रिल रोजी मृत्यू झाला होता. मृत्यू झाल्यानंतर तपासणी केली असताना त्यांनी करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं होतं.

सुरुवातील न्यूमोनिया झाल्याची तक्रार असल्याने त्यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण करोनाची लागण झाली असल्याचं समोर आल्यानंतर आरोग्य विभागाची धावपळ सुरु झाली होती. या रुग्णाच्या संपर्कात आल्याने आतापर्यंत ४० हून जास्त जणांना करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं आहे.

‘या’ कायद्याचं पालन केलं नाही तर, कायद्यापलीकडे कोणालाही क्षमा केली जाणार नाही । Jitendra Awhad |

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!