नवी दिल्ली : भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा हा 20, 000च्या पुढे गेला आहे. तर आता भारत 20 हजार आकडा गाठणारा जगातील 17वा देश आहे. राजस्थान, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या तीन राज्यात कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात होत आहे.
मंगळवारी रात्री उशिरा एकूण रुग्णांची संख्या 20 हजार इतकी नोंदली गेली आहे. दिवसभरात राज्यांमधून 1493 कोरोनाबाधितांची वृद्धी झाली आहे. नव्या कोरोनाबाधितांपैकी एक तृतीयांश प्रकरणे महाराष्ट्रातून आली आहेत. तर एकट्या मुंबईतून रविवारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 419 एवढी आली आहे.
राजस्थान (१५ ९) आणि पश्चिम बंगाल (५३) मध्येही संबंधित राज्यांत तीव्र वाढ दिसून आली. गुजरातमध्येही संक्रमणाची वाढ कायम आहे तर २३९ लोकांची चाचणी सकारात्मक आली आहे. महाराष्ट्र नंतर गुजरात हे कोरोना संक्रमणाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
दरम्यान राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाच हजारच्या पुढे गेली आहे. मंगळवारी दिवसभरात राज्यात 552 नवे कोरोना पॉझिटिव्हि रुग्ण आढळले आहेत. तर एका दिवसात 19 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 5218 वर पोहोचला आहे. दिलासादायक बाब म्हणजे एकूण 722 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
देशातील लॉकडाउन बाबतचा मोठा निर्णय | PM Modi Announced Big Decision About India’s Lockdown |
https://www.youtube.com/watch?v=JS-Bb4hxUBI
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

