टीम महाराष्ट देशा:उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार आज पहिल्यांदाच बारामतीत दाखल झाले.यावेळी कार्यकर्त्यांनी भव्य नागरी सत्काराचे आयोजन केले होते.पण अजित पवारांच्या सत्काराला पवार कुटुंबिय नव्हतेच.राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, पार्थ पवार यांसह अनेक दिग्गज नेते गैरहजर होते. या सत्कारासाठी फक्त अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा जय पवार असे दोन जण हजर होते.
सत्कारासाठी कालपासूनच कमानी सजल्या होत्या.आज बारामती शहरातून अजित पवार यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.त्यानंतर शहरातील शारदा प्रांगणात नागरी सत्कार झाला. यावेळी अजित पवारांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. या भव्य सत्कारासाठी पवारांच्या कुटुंबातील महत्त्वाच्या व्यक्ती गैरहजर होत्या.
अजित पवारांच्या सत्कारासाठी बारामती शहरासह गावातील लाखो कार्यकर्ते सहभागी झाले होते. असं असताना पवार कुटुंबिय मात्र या सत्कारासाठी हजर नव्हते. त्यामुळे शंका उपस्थित केली जात आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
