Share

साताऱ्यात ऑनलाईन कारभार ! जिल्हा परिषद शाळांमध्ये आता ऑनलाईन प्रवेश मिळणार

Published On: 

सातारा : देशभरात कोरोनाने कहर केला आहे. अचानक ओढवलेल्या या महामारीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्या मुळे शाळा कॉलेज सह शिकवण्या देखील पूर्ण पाने बंद आहे. मात्र शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी विद्यार्थ्यांचे शाळेत प्रवेश होणे महत्वाचे आहे. त्यामुळे साताऱ्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये आता ऑलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

सदारणतः दरवर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांचे शाळेत प्रवेश निश्चित झालेले असतात मात्र या वर्षी कोरोना संसर्गामुळे शाळा कधी पर्यंत पूर्वरत सुरु होतील या संदर्भात काही स्पष्ट चित्र दिसत नाही. मात्र यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष सुरु होण्यास विलंब होऊ नये म्हणून सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, शिक्षण,अर्थ व क्रीडा समिती सभापती मानसिंगराव जगदाळे आणि संजय भागवत यांच्या कल्पनेतून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

२०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी सातारा जिल्हा परिषदच्या कोणत्याही शाळांमध्ये https://forms.gle/dk82PaSoZo4gx19a8 या लिंक वरून प्रवेश मिळणार आहे. इयत्ता 1 ली साठी 15 ऑक्टोबर 2020 रोजी 6 वर्ष पूर्ण असणारी मुले प्रवेशास पात्र असतील असे देखील जिल्हा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

https://www.youtube.com/watch?v=JS-Bb4hxUBI

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!