Share

मतदान केंद्रावर शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांत हाणामारी

Published On: 

ठाणे : जिल्हापरिषद निवडणुकीसाठी सुरू असताना मतदान केंद्रावर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे. पोलिसांनी वेळेतच हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीमार केला असून सध्या घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.मतदान केंद्रावर भाजप कार्यकर्ता सतत फिरत असल्याने शिवसेनेच्या एका कार्यकर्त्यांनी त्याला अडविले. यावरुन शाब्दीक वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.

दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. भिवंडी तालुक्यात भाजपचे खासदार कपिल पाटील आणि शिवसेनेचे भिवंडी ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, तर मुरबाडमध्ये भाजप आमदार किसन कथोरे, राष्ट्रवादीचे शहापुरातील आमदार पांडुरंग बरोरा, मुरबाडमध्ये सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, माजी आमदार गोटीराम पवार यांची राजकीय कारकीर्द पणाला लागली आहे.

जिल्हापरिषदेचे भिवंडीत २१, शहापुरात १४, मुरबाडमध्ये ८, कल्याणमध्ये ६ आणि अंबरनाथमध्ये ४ गट मिळून असे ५३ गट आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!