Share

मराठा समाजाचा कर्तृत्वान खांब आज निखळला; खा. संभाजीराजे भावूक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सामान्य कार्येकर्ता ते एक “झुंजार सेनापती “ हा प्रवास संपुर्ण बहुजन चळवळीतील लढवय्या शांताराम बापू कुंजीर यांचे काल अल्पशा आजारांने निधन झाले आहे.

काल शांताराम बापू कुंजीर यांना जहांगिर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आहे. त्यानंतर बापूची तब्येत गंभीर होत गेली. लगेच डॉक्टरांनी ह्रदयाचे ॲापरेशन करण्याचा निर्णय घेतला तरी सुध्दा त्यास प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचे अल्पशा आजाराने मध्यरात्री त्यांचे निधन झाले आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी देखील ‘मराठा समाजाचा कर्तृत्वान खांब आज निखळला, मराठा आरक्षण तसेच बहुजन समाजाला एकत्र आणण्यासाठी आम्ही जो शिव शाहू दौरा काढला होता, त्या दौऱ्याचा कणा बापू होते,’ अशी भावना फेसबुक पोस्ट करत खा. संभाजीराजे यांनी व्यक्त केल्या आहेत.

https://www.facebook.com/YuvrajSambhajiraje/posts/1555120324646181

वाचा काय फेसबुक पोस्टमध्ये

बापू!!! भावपूर्ण श्रद्धांजली! मराठा समाजाचा कर्तृत्वान खांब आज निखळला!!!.वैयक्तिक माझे अन मराठा समाजाचे न भरून काढता येणारे नुकसान झाले आहे. परवाच मी त्यांना कॉल केला होता. तब्येतीची विचारपूस करून काळजी घेण्याचा आग्रह केला होता. पण आज ही बातमी आली अन मन सुन्न झाले.

मराठा आरक्षण तसेच बहुजन समाजाला एकत्र आणण्यासाठी आम्ही जो शिव शाहू दौरा काढला होता, त्या दौऱ्याचा कणा बापू होते. पडद्याच्या पाठीमागे राहून प्रत्येक बारीकसारीक गोष्टीचे नियोजन बापूंनी केले होते. बहुजन समाजाला एकत्र करण्यात बापूंनी अत्यंत मोलाचे कार्य केले आहे.

माझ्या सामाजिक राजकीय जडणघडणीत बापूंचे खूप मोठे योगदान होते. आम्ही जी चळवळ उभी केली होती, त्यात बापू सर्वात महत्वाचे व्यक्ती होते. माझ्या सार्वजनिक जीवनात खूप मोठा आधार होते. बापूंसारखा प्रामाणिक पणे मैत्री जपणारा मित्र गमावल्याचे दुःख मला यापुढे नेहमी राहील. बापूंचे चिरंजीव प्रशांत माझा लाडका आहे, असे त्यांच्या समोर अनेक वेळा मी बोललो होतो. त्यात कधीच कमतरता भासू देणार नाही. सर्व घरातल्या व्यक्तींना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!