Share

रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार: कोरोना पॉझिटिव्ह महिलेलाच दिला डिस्चार्ज

Published On: 

परभणी: या कोरोना महामारीमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले असताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यातच भर म्हणजे प्रशासनाचा जागोजागी दिसून येणारा भोंगळ कारभार. परभणी येथे एक धक्कादायक बाब घडली आहे. बुधवारी दुपारी रुग्णालयातून कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णाऐवजी पॉझिटिव्ह रुग्णालाच घरी सोडण्यात आल्याची खळबळजनक माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासन कोरोना हाताळ्यण्यात किती गंभीर लक्ष देत आहे हे दिसून येत आहे.

तीन दिवसांपूर्वी पूर्णा येथील एक कोरोनाबाधित महिलेला जिल्हा रुग्णालयात आयसोलेट करण्याचे आले होते. परंतु, अवघ्या तीन दिवसातच या महिलेला रुगणालयातून कोरोना निगेटिव्ह झालात म्हणून सुट्टी देण्यात आली. सदर महिला घरी पोहोचल्यानंतर तिच्या नातेवाईकांना आश्चर्य वाटले. यानंतर त्यांनी अधिक चौकशी केली असता धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सरकारी कोविड सेंटरपेक्षा मराठी शाळांची सुविधा उत्तम; राळेगणसिद्धिच्या ग्रामस्थांची भूमिका !

गंगाखेड येथील निगेटिव्ह झालेल्या आणि नावात साम्य असलेल्या एका महिलेऐवजी पूर्णा येथील पॉझिटिव्ह महिलेलाच डिस्चार्ज दिल्याची बाब उघडकीस आली. रात्री उशिरा या कोरोना पॉझिटिव्ह महिलेला रुग्णवाहिका पाठवून पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर गंगाखेड येथील कोरोनातून बऱ्या झालेल्या महिलेला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. या संदर्भात झी २४ तासने वृत्त दिले आहे.

नायडू जेव्हा स्वतः लुंगी घालून फिरतात तेव्हा सभागृहाचा अपमान होत नाही का ? ब्राम्हण महासंघाचा सवाल

त्यामुळे पॉझिटिव्ह महिला घरी परतल्यानंतर तिचा संपर्क आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा शोध घेत संभाव्य धोका टाळण्याचे प्रयत्न केले जात आहेत. तर, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून तात्काळ चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने समिती नेमण्यात आली आहे. या घटनेमुळे परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराचा नमुना पुन्हा एकदा समोर आला असून नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन, औरंगाबादमध्ये आंदोलक ताब्यात!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!