मुंबई : ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या लोकप्रिय मालिकेतील ‘ओम’ आणि ‘स्वीटू’ची अफलातून लव्हस्टोरी प्रेक्षकांना खूपच आवडू लागली आहे. त्यांच्याबद्दल प्रत्येक गोष्ट ऐकण्याची तसेच फोटो आणि व्हिडिओ पाहणे प्रेक्षक पसंत करीत आहेत. ही जोडी तशी बऱ्याचदा चर्चेत ही असते.
या जोडीचा एक व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ थोडा ब्लर आहे, मात्र यात अन्विता फलटणकर आणि शाल्व किंजवडेकरला तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता. यात अन्विताने पिवळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला आहे, तर शाल्वने करड्या रंगाचा शर्ट आणि काळी पँट घातली आहे. या व्हिडिओमध्ये दोघे अतिशय मजेदार अंदाजात नाचताना दिसत आहे. यातील त्यांच्या डान्स स्टेप्स अगदी पाहण्यासारख्या आहेत. यावरून लक्षात येईल की, केवळ ऑनस्क्रीनच नव्हे, तर ऑफस्क्रीनही दोघांची केमिस्ट्री खूप छान आहे.
https://www.instagram.com/p/CUuirXhvdoY/?utm_medium=copy_link
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘हे नक्की आपले शाल्विताच आहेत ना? की दुसरे कोणी?? ‘ असं लिहलं असून सोबतच लाल हार्ट ईमोजी देखील बनवले आहेत. अन्विताबद्दल सांगायचं तर तिने नाटकांपासून ते बऱ्याच चित्रपटामध्ये अभिनय करून, प्रेक्षकांची चाहती बनली आहे. ओम आणि स्वीटूचा हा रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडिया युजर्सचे लक्ष वेधून घेत आहे. चाहते कमेंट सेक्शनमध्ये दोघांवर भरभरून प्रेम व्यक्त करत आहेत. शिवाय या दोघांमध्ये काहीतरी चालू आहे का? असंही कमेंटमध्ये बोललं जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नवरात्री तिसरा दिवस : अपूर्वा नेमळेकरने साकारले जया गौरी दुर्गा परमेश्वरीचे रुप
- ‘पुन्हा लॉकडाऊनची वेळ येऊ नये यासाठी नागरिकांनीच सतर्क राहून संभाव्य लाट थोपवावी’
- उद्धव साहेबांची उपस्थिती आमच्यासाठी बाळासाहेबांचा आशिर्वाद- नितेश राणे
- “मोतीलाल नगरच्या पुनर्विकासाचा निर्णय म्हणजे मागच्या दाराने बिल्डरला आंदण होय”
- आयकर विभागाच्या छाप्यांबाबत आघाडी सरकारने खुलासा करावा; केशव उपाध्ये यांची मागणी


