🕒 1 min read
मुंबई : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने यावरुन महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्यावरुन राज्यातील विरोधी पक्ष भाजपमधील नेत्यांकडून मावळ घटनेचे दाखले देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका करण्यात आली. त्यांच्या या टीकेला शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं आहे.
‘मावळमध्ये काय झालं असा आरोप भाजपने केला. त्यांना सांगायचं आहे. त्यावेळी शेतकरी मृत्यूमुखी पडले त्याला जबाबदार राजकीय पक्ष किंवा नेते नव्हते. त्यावेळी आरोप पोलिसांवर होते. माजी गृहमंत्री यांनी-लखीमपूर घटनेशी तुलना केली. परंतु हे लक्षात घ्यावं की मावळ घटनेवरून लोकांना हे माहीत झालं की या घटनेला सरकार जबाबदार नव्हतं तर स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रोत्साहन दिलं आहे हे स्पष्ट झालं आहे, असं ते म्हणाले. मावळच्या घटनेबाबत ज्यावेळी लोकांना कळलं त्यानंतर हे स्पष्ट झालं की सरकार याला जबाबदार नव्हतं. त्यामुळेच मावळमध्ये राष्ट्रवादीचे आमदार 90 हजार मतांनी निवडून आले आहेत, असं शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले.
यानंतर आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी पवारांवर हल्लाबोल केला आहे. मावळ गोळीबार झाला तेव्हा तुमचाच गृहमंत्री होता, जरा तरी लाज बाळगा असे म्हणत भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
जनता मूर्ख आहे या गृहितकावर आजवर @PawarSpeaks यांचे राजकारण सुरू आहे.
मावळ घटनेला काँग्रेस सरकार जबाबदार नव्हतं, स्थानिक भाजप नेत्यांनी आंदोलकांना चिथावलं असा त्यांचा दावा आहे.
नि:शस्त्र आंदोलकांवर गोळीबार झाला तेव्हा राज्यात पवारांच्या पक्षाचे गृहमंत्री होते. जरा तरी लाज बाळगा.— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 13, 2021
‘जनता मूर्ख आहे या गृहितकावर आजवर शरद पवार यांचे राजकारण सुरू आहे. मावळ घटनेला काँग्रेस सरकार जबाबदार नव्हतं, स्थानिक भाजप नेत्यांनी आंदोलकांना चिथावलं असा त्यांचा दावा आहे. नि:शस्त्र आंदोलकांवर गोळीबार झाला तेव्हा राज्यात पवारांच्या पक्षाचे गृहमंत्री होते. जरा तरी लाज बाळगा’ असे ट्विट भातखळकर यांनी केले आहे.
काय म्हणाले शरद पवार?
मावळमध्ये आता चित्र बदललं आहे. लोकांना वस्तुस्थिती कळाली आहे. माझ्या जिल्ह्यातील तालुका असल्यामुळे सांगत, मावळ तालुक्यात सातत्यानं जनसंघ, नंतर भाजप होतं. रामभाऊ म्हाळगी हे नेहमी मावळचे प्रतिनिधी होते, असंही पवार म्हणाले. इतकंच नाही तर मावळमध्ये लोकांना भडकावण्याचं काम कुणी केलं हे लक्षात आल्यानंतर त्या मावळमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. सुनील शेळके हे 90 हजाराच्या फरकानं निवडून आले आहेत. मावळमध्ये संताप असता तर एवढ्या फरकानं राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला नसता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मावळची स्थिती समजून घेतली तर त्यांच्या ज्ञानात भर पडेल, असा टोलाही पवारांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- 100 टक्के क्षमतेनं थिएटर सुरु करा, अमोल कोल्हेंनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली मागणी
- ‘महात्मा गांधींच्या सूचनेवरूनच सावरकरांनी दया याचिका दाखल केली’, राजनाथ सिंह यांचा दावा
- ‘पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात मुलीची निर्घृण हत्या होणं सामाजिक अध:पतनाचं लक्षण’
- पोलिसांची प्रतिमा सुधारण्यासाठी पोलिसांनाच सामूहिक प्रयत्न करावे लागतील – वळसे पाटील
- ‘खुल्या बाजारातून महागड्या दराने वीज खरेदी करून ग्राहकांची वीजेची गरज भागवली जात आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
