Share

‘…तुम्हाला त्या सामन्याचा सतत विचार करावा लागत नाही’ ; पाकविरुद्धच्या सामन्यावर गंभीरने दिली प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवारी टी -20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले. भारत 24 ऑक्टोबर रोजी दुबईत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध सामन्याला सुरुवात करेल. आयसीसीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, भारताचा पुढील सामना दुबईमध्ये न्यूझीलंडशी 31 ऑक्टोबरला, त्यानंतर अफगाणिस्तान सोबत 3 नोव्हेंबरला अबुधाबीमध्ये होणार आहे.

भारत आणि पाकिस्तान सामना म्हंटल की चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळते. दरम्यान, भारत-पाकिस्तान सामना पहिलाच असून, पाकिस्तानविरुद्ध कोणत्याही मोठ्या स्पर्धेत सुरुवातीला खेळणेच चांगले असल्याचे मत भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने व्यक्त केले.

असे गंभीर म्हणाला, २००७ सालच्या टी-२० वर्ल्डकपमध्ये आमचा सलामीचा सामना स्कॉटलंडविरुद्ध होता. परंतु, पावसामुळे तो सामना रद्द करावा लागला. त्यानंतर आम्ही पाकिस्तानविरुद्ध खेळलो. त्यामुळे तोच आमचा त्या स्पर्धेतील पहिला सामना होता असे आपण म्हणू शकतो. भारताच्या दृष्टीने पाकिस्तानविरुद्ध स्पर्धेच्या सुरुवातीलाच खेळणे कधीही चांगले असते. कारण तुम्हाला त्या सामन्याचा सतत विचार करावा लागत नाही. पाकिस्तानविरुद्धचा सामना झाल्यावर तुम्ही संपूर्ण स्पर्धेवर लक्ष केंद्रित करू शकता,’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!