Share

‘या’ बँकेचे चेकबुक होणार लवकरच बंद; नव्या चेकबुकसाठी त्वरीत अर्ज करा

Published On: 

मुंबई : 1 एप्रिल 2020 रोजी ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाचे पंजाब नॅशनल बँकेत विलीनीकरण झाले आहे. त्यामुळे येत्या 1 ऑक्टोबर पासून 3 बँकांचे चेकबुक आता बंद होणार आहे. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि अलाहाबाद बँक या तीन बँकांचे चेकबुक आणि एमआयसीआर कोड अवैध ठरणार आहे.

ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाचे पंजाब नॅशनल बँकेत विलीनीकरण झाल्याने आता ग्राहकापासून दोन्ही बँकांच्या शाखेपर्यंत सर्वकाही पीएनबीचे आहे. तर अलाहाबाद बँक इंडियन बँकेत विलीन झाली आहे. हे विलीनीकरण 1 एप्रिल 2020 पासून लागू झाले आहे.

अलाहाबाद बँकेचे पूर्वीचे MICR कोड आणि चेकबुक 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वैध असतील. कोणत्याही व्यत्ययाशिवाय बँकिंग व्यवहार सुरू ठेवण्यासाठी, ग्राहकांनी 1 ऑक्टोबर 2021 पूर्वी नवीन चेकबुक घ्यावे, असे इंडियन बँकेने ट्वीट करत माहिती दिली आहे. ग्राहक जवळच्या शाखेतून नवीन चेकबुक मिळवू शकतात. या व्यतिरिक्त, आपण इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगद्वारे देखील अर्ज करू शकता, असेही इंडियन बँकेचे म्हणणे आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!