Share

आव्हाडांऐवजी दुसऱ्या कुणाला त्वरित जामीन मिळाला असता का?; राम कदमांचा सवाल

Published On: 

मुंबई : अभियंता अपहरण आणि मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांंना ठाणे पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना न्यायलयात हजरही करण्यात आलं. त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांनी या माहितीस दुजोरा देण्यात आला आहे. दरम्यान, ठाकरे सरकारमधील मंत्र्यावर झालेल्या या कारवाईन मोठी खळबळ उडाली आहे.

मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक झाल्याची माहिती भाजपनेते किरीट सोमय्या यांना दिली. गेल्यावर्षी एप्रिलमध्ये अनंत करमुसे यांना झालेल्या मारहाण प्रकरणात ही कारवाई झाल्याची माहिती सोमय्यांनी दिली आहे. ठाणे पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर काही वेळातच त्यांना जामीन मिळाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यावर भाजप नेते राम कदम यांनी त्यांच्या जामीनावरून राज्याच्या पोलिस प्रशासनावर टीका केली.

राज्यातील जनतेवर अनैसर्गिकरित्या लादल्यागेलेलं सरकार आल्यापासून अन्यायाच्या आणि लोकांच्या छळ केल्याच्या अनेक घटना समोर आल्या. करमुसेना यांना जी मारहाण झाली ती निदंणीय होती असं राम कदम यांनी यावेळी सांगतिलं. जितेंद्र आव्हाड यांना ज्या पद्धतिनं अटक करून लगेच जामीन मिळाला तसा दुसऱ्या कोणाला मिळाला असता का असा प्रश्न राम कदम यांनी उपस्थित केला. या प्रकरणी त्यांनी पोलीस खात्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!