🕒 1 min read
मुंबई : औरंगाबाद येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी असेलल्या पोलिसांवर हल्ला केल्याची घटना घडली होती. यावर आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संतप्त होऊन प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांवर होणारे हल्ले हे अजिबात सहन केले जाणार नाहीत. तर आदेशानुसार हल्लाखोरांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असे अनिल देशमुख यांनी ट्विटरवरून सांगितले आहे.
कोरोनामुळे लॉक डाऊन व सामाजिक अंतर पोलिस कडकपणे लागू करत आहेत. या दरम्यान पोलिसांवर हल्ले वाढतायत. पोलिसांवरील १५९ हल्ल्यांमध्ये ५३५ जणांना अटक झाली आहे. असे हल्ले शासन सहन करणार नाही, अशा हल्लेखोरांवर कठोरात कठोर कारवाई होईल.#ZeroToleranceForAttackOnCops
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) April 28, 2020
अनिल देशमुख यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर लिहिले आहे की, कोरोनामुळे लॉक डाऊन व सामाजिक अंतर पोलिस कडकपणे लागू करत आहेत. या दरम्यान पोलिसांवर हल्ले वाढतायत. पोलिसांवरील १५९ हल्ल्यांमध्ये ५३५ जणांना अटक झाली आहे. असे हल्ले शासन सहन करणार नाही, अशा हल्लेखोरांवर कठोरात कठोर कारवाई होईल.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पोलीस कर्मचारी आणि आरोग्य यंत्रणा आपला जीव धोक्यात घालून कार्यरत आहेत. अनेक पोलीस हे आज कोरोनाबाधित देखील झाले आहेत. तर आतापर्यंत 3 पोलीस हे कोरोनाच्या युद्धात शहीद झाले आहेत. तरी देखील काही नागरिक परिस्थितीचे गांभीर्य न बाळगता शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून उलट पोलिसांवरचं हल्ले करत आहेत. त्यामुळे अशा निर्दयी हल्लाखोरांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असे अनिल देशमुख म्हणाले.
दरम्यान कोरोनाच्या संकटात फ्रंट लाईनवर लढणाऱ्या 3 पोलिसांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर आता मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलीस दलात 55 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या कर्मचाऱ्यांना घरात थांबण्याची सूचना देण्यात आल्या आहेत.ज्या कर्मचाऱ्यांचं वय 55 वर्षांपेक्षा जास्त आहे, त्यांनी बंदोबस्तात सहभागी होऊ नये, असं मुंबई पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 24X7 ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
