मुंबई : गेल्या आठवड्यात सांताक्रूज पटेलनगर येथे विजेच्या धक्क्याने माय-लेकाचा मृत्यू झाल्यानंतर नागरिकांनी रास्ता रोको केला होता. त्यावेळी “आम्ही हातांची साखळी करून महापौरांना रस्त्यात रोखले असता महाडेश्वर सरांनी फक्त माझा हात बाजूला केला, त्यांनी माझा हात पिरगळला नाही” असे ‘त्या’ महिलेने स्पष्ट केले. एका व्हिडिओद्वारे तिने गेल्या आठवड्यात घडलेल्या प्रकारावर भाष्य केले.
पश्चिम द्रुतगती मार्गाजवळ सांताक्रुझ पूर्व येथील पटेल नगरमध्ये महापौर विश्वनाथ महाडेश्वरांना स्थानिकांनी घेरलं होतं. या परिसरात अतिवृष्टीमुळे तब्बल 72 तास पाणी तुंबलं होतं. मात्र, एकही लोकप्रतिनिधी येथील परिस्थिती सावरण्यास आला नाही, त्यामुळे स्थानिकांमध्ये रोष होता. त्यातच, याठिकाणी पाणी तुंबल्यामुळे विजेचा धक्का लागून एकाच घरातील दोघांचा मृत्यू देखील झाला. त्यामुळे स्थानिकांमध्ये संताप होता. हा संताप स्थानिकांनी महाडेश्वरांवर व्यक्त केला होता यावेळी हा प्रकार घडला होता.
नेमकं काय म्हणणे आहे या महिलेचं
“महापौर विश्वनाथ महाडेश्वर सरांनी माझा हात पिरगळला नाही. त्यांनी माझा विनयभंग केलेलाच नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रश्नच येत नाही. काही राजकीय पक्ष चुकीचा प्रचार करत आहेत. महाडेश्वर यांनी एका महिलेचा विनयभंग केला, त्यांनी महिलेचा हात मुरगळला’ असा संदेश प्रसारित करणारा “व्हिडीओ व्हायरल करण्यामागे एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असून त्यामागे विश्वनाथ महाडेश्वर सरांची बदनामी करणं हा त्यांचा हेतू आहे.
महत्वाच्या बातम्या
-
मुख्यमंत्री महापालिकेच्या कामात ढवळाढवळ करतात- विश्वनाथ महाडेश्वर
-
कोल्हापुरला नाना पाटेकर यांनी दिली भेट, ‘नाम’च्या वतीने पूरग्रस्तांना 500 घर बांधून देणार
-
मध्य प्रदेशात कमलनाथांचा ‘राज ठाकरे पॅटर्न’

