टीम महाराष्ट्र देशा – देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणा आणि सरकारकडून अधिक कठोर उपाय करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी लॉक डाऊन १४ एप्रिल वरून ३० एप्रिलपर्यंत वाढवला आहे. महाराष्ट्रात देखील लॉक डाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे.
देशभरातील आता ७४४७ रुग्ण जाहले असून गेल्या २४ तासात तब्बल १०३५ नवे रुग्ण वाढले आहेत. याबाबतची माहिती भारत सरकारकडून देण्यात आली आहे. तसेच जर देशात लॉक डाऊन जाहीर केला नसता आणि खबरदारीचे उपाय केले नसते तर १५ एप्रिल पर्यंत देशात कोरोना रुग्णांची संख्या ८,२०,००० झाली असती असं दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी केलं आहे. हे माहिती ANI या वृत्त संस्थेने दिली आहे.
Correction: Without this lockdown and without containment measures, India would have had 8.2 lakh cases by 15th April: Lav Aggarwal, Joint Secretary, Union Health Ministry #COVID19 pic.twitter.com/VhJjwBE56k
— ANI (@ANI) April 11, 2020
देशातील एकूण # कोविड १९ / करोना संक्रमित रुग्णांची संख्या ७४४७ झाली असून ६४२ लोक आतापर्यंत बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांत – १०३४ नवीन रुग्ण वाढले असून ४० जणांचे मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत एकूण २३९ मृत्यूची नोंद झाली आहेः भारत सरकार
Total no. of #COVID19 cases in the country is 7,447 now, 642 people have recovered. In the last 24 hours – there have been 1,035 new cases and 40 deaths. Total 239 deaths have been reported so far: Govt of India pic.twitter.com/VLAfSFkLMZ
— ANI (@ANI) April 11, 2020
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

