Share

जवानाच्या खात्यातून भामट्याने ५१ हजार लांबवले, वर्षभरानंतर गुन्हा दाखल

Published On: 

औरंगाबाद : लष्करातील जवानाच्या खात्यातून भामट्याने परस्पर ५१ हजार पाचशे रुपये लांबवले. हा प्रकार १ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडला. याप्रकरणी वर्षभरानंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक साहेबराव सोनवणे (मुळ रा. निमगाव, ता. मालेगाव, जि. नाशिक, ह. मु. आर्टलरी ब्रिगेड, तोफखाना, छावणी) असे भामट्याने गंडा घातलेल्या लष्करातील जवानाचे नाव आहे. दीपक सोनवणे यांच्या एटीएम कार्डचा गोपनीय क्रमांम दिलेला नसतांना देखील भामट्याने त्यांच्या खात्यातून परस्पर ५१ हजार ५०० रूपये १ जानेवारी २०२० रोजी लंपास केले. हा प्रकार दीपक सोनवणे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून भामट्याविरूध्द ६ फेब्रुवारी रोजी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोज पगारे करत आहेत.

या प्रकरणात एक वर्षानंतर गुन्हा दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. असे प्रकार रोखण्यासाठी सायबर पोलिसांच्या वतीने वारंवार जनजागृती करण्यात येते. मात्र, अनेकदा शुल्लक चुकीमुळे असे प्रकार समोर येत आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!