Share

अम्मा भगवान यांच्या नावे भाविकांच्या मनात भीती घालत करोडो रुपयांची लूट

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : अम्मा भगवान यांच्या नावे बऱ्याच वर्षांपासून ऑनलाईन दर्शन, प्रत्यक्ष दर्शन, हवन नवनवीन प्रोसेस निर्माण करून अनेक भाविकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याबाबत पुणे व पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील सांगवी, हडपसर, मोशी या ठिकाणी फसवणुकीचे गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. यासंदर्भात कारवाई करा अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.

बऱ्याच वर्षांपासून अम्मा भगवान यांच्या नावाखाली म्हणजे त्याच्या नावाचा फायदा घेत ऑनलाईन दर्शन, प्रत्यक्ष दर्शन, हवन नवनवीन प्रोसेस निर्माण करून अनेक भाविकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. भाविकांना होमहवन, पूजा केली नाही तर रात्री फोटो ठेवून काळी जादू करून किंवा आर्थिक नुकसान, घरावर वाईट संकट येईल अश्या अनेक गोष्टींची भीती दाखवत महाराष्ट्रातून करोडो रुपयांची लूट व फसवणूक केली गेली आहे. भक्तांकडून रोख रक्कम, सोने घेऊन करोडो रूपयाची फसवणूक झाली आहे.

पुणे व पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील सांगवी, हडपसर, मोशी या ठिकाणी फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच इतर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. मात्र पोलीस काही तरी कारणे सांगून टाळाटाळ करत असल्याचा आरोपही फसवणूक झालेल्या तक्रारदारांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान करोडो रुपयांची फसवणूक करणाऱ्यावर जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला जावा. ऑनलाईन प्रोसेस व हवन यावरती तात्काळ बंदी घालण्यात यावी. तसेच फसवणूक करणाऱ्या आरोपीना तात्काळ अटक करून कारवाई करावी अशी मागणी आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पत्रकार परिषद घेत केली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!