मुंबई : चीन, इटली, अमेरिका, स्पेन यांसारख्या महासत्ता देशात कोरोनाने हाहाकार माजला असताना आता भारतातही या विषाणूने चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. या संकटाशी सामना करण्यासठी देशातील मोठमोठे उद्योग समूह सहकार्य करत आहेत. रिलायन्स, टाटानंतर, कोटक नंतर आता आयटी कंपनी विप्रो आणि त्याचे संस्थापक अझीम प्रेमजी फाउंडेशनही मदतीसाठी पुढे आले आहेत.
विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी यांनी कोरोनाविरोधात लढण्यासाठी 1125 कोटी रुपयांच्या मदत जाहीर केली आहे. विप्रोने याबाबत एक निवेदन जाहीर केले आहे. ‘अझीम प्रेमजी फाउंडेशनने एकत्र येत मदत दिली आहे. यामध्ये मोठा वाटा प्रेमजी फाउंडेशनचा असेल. विप्रो लिमिटेड 100 कोटी देईल, विप्रो इंटरप्रायजेस 25 कोटी आणि फाउंडेशन 100 कोटी रुपये दान करतील. ही रक्कम वार्षिक सीएसआर रकमेपेक्षा वेगळी असून यासोबत अझीम प्रेमजी फाउंडेशनच्या कल्याणकारी खर्चाव्यतिरिक्त आहे.हा पैसा संसर्गजन्य परिसरातील लोकांची मदत, आराेग्य सुविधांवर खर्च केली जाईल. याची अंमलबजावणी प्रेमजी फाउंडेशनच्या 1600 कर्मचाऱ्यांची टीम करणार आहे. ‘ असे या निवेदनात म्हंटले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अझीम प्रेमजी यांनी 50 हजार कोटींची संपत्ती दान केल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते. अझीम प्रेमजी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शिक्षण आणि नोकरीसाठी यापूर्वीही ते मदत करत आले आहेत. आपल्या ताब्यात असलेले कंपनीचा 34 टक्के हिस्सा त्यांनी या पूर्वीच दान केला होता. आतापर्यंत त्यांनी 21 अब्ज डॉलर म्हणजे 1 लाख 47 हजार कोटी इतकी रक्कम दान केली आहे. शिक्षण क्षेत्रासाठी उत्तर पूर्व भारतात त्यांनी उपक्रम सुरू केले आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

