Share

३ मे नंतर ग्रीन झोनमध्ये वाईन शॉप्स उघडण्यास केंद्राची सशर्त परवानगी

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकारनं पुन्हा एकदा लॉकडाउनचा कालावधी १७ मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. सर्व राज्यांमधील करोनाग्रस्तांची माहिती आणि त्याची समीक्षा केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

याआधी करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर २३ मार्च ते  १४ एप्रिल पहिला लॉक डाऊन होता. त्यानंतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला होता. यात अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात यावा अशी विनंती केली होती. त्यानंतर लॉकडाउनच्या कालावधीत ३ मे पर्यंत वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा दोन आठवड्यांसाठी लॉकडाउन वाढवण्याची घोषणा सरकारनं केली आहे.

वाइन शॉप्स आणि पानाची दुकानं उघडण्यास सशर्त परवानगी-

आता ग्रीन झोनमध्ये वाइन शॉप्स आणि पानाची दुकानं सोमवारपासून उघडण्यात येणार आहेत. ग्राहकांनी वाइन शॉप किंवा पानाच्या गादीवर सहा फूट अंतर राखून रांग लावावी असं सांगण्यात आलं आहे. खरेदी करताना ग्राहकांनी सहा फुटांचं अंतर राखणं आवश्यक, एकावेळी शॉपमध्ये पाचपेक्षा जास्त लोक नकोत अश्या अटीही घालण्यात आल्या आहेत

तसेच पाचपेक्षा जास्त माणसं एकावेळी शॉपमध्ये असू नये असंही सांगण्यात आलं आहे. पुढील दोन आठवड्यांसाठी लॉकडाउन वाढवण्यात आला असला तरीही ग्रीन झोनमध्ये वाइन शॉप आणि पानाची गादी सुरु करण्यास संमती देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने या संदर्भातले निर्देश दिले आहेत. ANI या वृत्तसंस्थेने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. महाराष्ट्रातले सध्या उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचिरोली, वर्धा हे सहा जिल्हे ग्रीन झोनमध्ये आहेत.

हेही पहा – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!