Share

‘तुम्ही काय आमचं मूल्यांकन करणार, तुमची व्हॅल्यू..’, सोमय्यांची राऊतांवर टोलेबाजी

Published On: 

पुणे : भाजपा नेते किरीट सोमय्या आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यातील वादानंतर शिवसेनेने त्यांच्या ‘सामना’ अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टोलेबाजी केली होती. त्या उत्तर देत पाटलांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्र लिहिले होते. त्या पत्रावरून पीएमसी बँक घोटाळ्याबाबत चंद्रकांत पाटील यांनी केलेले आरोप मान्य नाही त्यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात येईल आणि त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते. आपण पाटलांवर सव्वा रुपयांचा दावा ठोकणार असून त्यांची तेवढीच किंमत आहे, असेही यावेळी ते म्हणाले होते. दरम्यान, सोमय्या यांनी देखील मानहानीचा प्रकरणात आता उडी घेतली आहे.

पुण्यातील तळेगाव येथे प्रसारमाध्यमांशी बोलतांना सोमय्या म्हणाले की,’संजय राऊत म्हणजे उद्धव ठाकरे आहेत. त्यांनी चंद्रकांत पाटील यांचे सव्वा रुपया मूल्यांकन केले. अहंकारी संजय राऊतांनी चंद्रकांत पाटील यांची किंमत ही सव्वा रुपया असल्याने सव्वा रुपयांचा मानहाणीचा दावा करणार आहे अस म्हटलं आहे. तुमच्या ठाकरे सरकारचे नेते किरीट सोमय्याला दर आठवड्याला १०० कोटींची नोटीस पाठवतात. किरीट सोमय्यांच मूल्यांकन तुम्ही साडेपाच कोटी करत आहात काय? संजय राऊत तुमची व्हॅल्यू ५५ लाखांची आहे. पीएमसी बॅंकेतील ५५ लाखांची रक्कम तुम्ही चोरली होती. तुम्ही काय आमचं मूल्यांकन करणार’ असेही ते म्हणाले.

दरम्यान, ‘मी येत्या २६ तारखेला अलिबागला जाणार आहे. त्यानंतर २८ तारखेला आंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी कोल्हापूरला जाणार आहे. मी हे ठाकरे सरकारला कळवलेआहे. आता पाहुयात ठाकरे सरकार पुन्हा एकदा घोटाळेबाज हसन मुश्रीफ यांना वाचवण्यासाठी मला पुन्हा एकदा थांबवण्याचा प्रयत्न करतय. कोल्हापूर पासून साताऱ्याला अजित पवार यांच्या जरंडेश्वर यांच्या कारखान्याची तिथल्या शेतकऱ्यांची भेट घेणार’ असल्याचेही यावेळी सोमय्या यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!