Share

‘या’ दिग्गज खेळाडूंसाठी यंदाची आयपीएल शेवटची ठरणार ?

Published On: 

मुंबई : आयपीएलच्या आगामी पर्वासाठी खेळाडूंचा लिलाव हा १८ फेब्रुवारीला होणार आहे. या बोली प्रक्रियेआधी सर्व फ्रँचायजीने आपल्या ताफ्यातील रिलीज आणि रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक संघांनी मोठ्या आणि अनुभवी खेळाडूंना रिलीज केलं आहे. यामुळे इतर फ्रँचायजींमध्ये या खेळाडूंना खरेदी करण्यासाठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. तर काही दिवसांपूर्वीच सर्व संघांनी आपल्या रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी देखील जाहीर केली. स्टीव स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, आरोन फिंच सारख्या खेळाडूंना संघांनी सोडलेले असल्याने आगामी आयपीएल लीलावाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

आयपीएल 2021 लिलावासाठी नोंदणी केलेला माजी वेगवान वेगवान गोलंदाज एस. श्रीसंत 8 वर्षानंतर लीगमध्ये कमबॅक करू शकतो. वेगवान गोलंदाजाने यापूर्वी भारताच्या घरेलू क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. काही खेळाडू स्पर्धेत पदार्पण आणि कमबॅक करू शकतात तर आगामी आवृत्ती काही दिग्गजांसाठी अखेरची ठरू शकते.

इमरान ताहीर 

दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फिरकीपटू ताहीर देखील यंदा आंतील वेळा आयपीएल खेळताना दिसु शकतो. युएईमध्ये मोजके सामने सामने खेळलेल्या ताहीरला यंदा चेन्नई सुपर किंग्सने त्याला रिटेन करत सर्वानाच चकित केलं. शिवाय, सीएसकेच्या ‘डॅडीज आर्मी’चा तो सर्वात वयस्कर खेळाडू आहे आणि आगामी आयपीएल हंगामात तो 42 वर्षांचा होईल. मात्र, त्याचे वय आणि फॉर्म पाहता त्याला पुढील वर्षासाठी फ्रँचायझी कायम ठेवेल याची शक्यता कमी असल्याने यंदाचा हंगाम या आफ्रिकी गोलंदाजासाठी अखेरचा ठरू शकतो.

हरभजन सिंह 

आयपीएलचा 14वा शेवटचा हंगाम अखेरचा असणारा भज्जी दुसरा खेळाडू ठरू शकतो. हरभजन लीगच्या इतिहासातील सर्वाधिक विकेट घेणाऱ्या फिरकी गोलंदाजांपैकी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून यापूर्वीच त्याने निवृत्ती घेतली आहे आणि त्यानंतर ‘वैयक्तिक कारणास्तव’ गेल्या वर्षी आयपीएलमधून माघार घेतली होती, मात्र आगामी लिलावात त्याला एखादा खरेदीदार मिळतो की नाही हे पाहणे सर्वात आधी रंजक ठरेल.

अंबाती रायुडू 

रायुडू आता बर्‍याच हंगामापासून सीएसके फ्रँचायझीचा भाग होता. यापूर्वी त्याने या संघाला भूतकाळात अनेक मोठे सामने जिंकण्यास मदत केली आहे, परंतु गेल्या मोसमात त्याचा फॉर्म खराब राहिला आहे. 2019 मध्ये वर्ल्ड कपच्या संघात निवड न झाल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती पण त्याने पुन्हा पुनरागमन केले. आयपीएल 2022 साठी फ्रँचायझी नवीन संघ उभारणी करण्याच्या प्रयत्नात असल्याने रायुडू त्यांच्या योजनांचा भाग असण्याची शक्यता कमीच आहे, त्यामुळे आयपीएल 2021 नंतर लीगमधून निवृत्ती जाहीर करू शकतो.

क्रिस गेल

किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी सार्वधिक धावा करणारा फलंदाज असला तरी, त्याचे वय आणि पुढच्या वर्षी मेगा लिलाव यामुळे त्याला फ्रॅन्चायझी त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्याचा विचार करू शकते. मेगा ऑक्शनमध्ये फ्रँचायझी पुढील 3 वर्षांसाठी संघ तयार करतात आणि गेल 42व्या वर्षी कोणत्याही संघाच्या योजनांचा भाग होण्याची शक्यता कमीच आहे. विशेष म्हणजे, तो आयपीएलमध्ये एकदा अनसोल्ड राहिला आहे आणि 2018 मध्ये, तिसर्‍यांदा त्याचे नाव समोर आल्यानंतर केवळ किंग्स इलेव्हन पंजाबने त्याच्यासाठी बोली लावली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!