Share

विधान परिषदेसाठी पुण्यातून ‘या’ निष्ठावंत नेत्याला आता तरी संधी मिळणार का ?

Published On: 

पुणे : विधान परिषदेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नियुक्त करण्यास राज्यपालांनी नकार दिल्याने निर्माण झालेल्या तिढय़ावर अखेर निवडणूक आयोगाने मार्ग काढला आणि २१ मे रोजी विधान परिषदेच्या नऊ रिक्त जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याने मुदतीत आमदार होण्याचा ठाकरे यांचा मार्ग मोकळा झाला.

महाराष्ट्र विधान परिषदेची निवडणूक घेण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी परवानगी दिली. करोनासंदर्भातील सर्व प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करून ही निवडणूक होत आहे.विधान परिषदेच्या नऊ जागा २४ एप्रिल रोजी रिक्त झाल्या होत्या. करोनाच्या आपत्तीमुळे राज्यसभा तसेच विधान परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला विधान परिषदेची निवडणूक घेण्याची विनंती केली. सध्या अमेरिकेत असलेले मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दूरचित्र संवादाद्वारे चर्चा करून २७ मेपूर्वी निवडणूक घेण्याचा निर्णय जाहीर केला.

विधान परिदषदेच्या 21 मे रोजी होणारया रिक्त जागेकरिता अनेकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. पुण्यातून कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अभय छाजेड यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. अभय छाजेड हे गेली 35 – 40 वर्षे कॉंग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून कार्यरत आहेत. त्यांनी सर्वात जास्त, म्हणजे सुमारे 11 वर्षे पुणे शहर कॉंग्रेसचे अध्यक्षपद यशस्वीरित्या सांभाळले होते. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत पुण्यात कॉंग्रेसला सुगीचे दिवस आले होते. पण ते पायउतार झाल्यावर महापालिकेपासून ते लोकसभा व अगदी अलीकडच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत पक्षाला सातत्याने दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

आपल्या मितभाषी, शांत व सुस्वभावी वृत्तीमुळे छाजेड हे कार्यकर्त्यांना आपलेसे वाटतात व ते कार्यकर्त्यांच्या भावना अडीअडचणी नीट ऐकून घेतात. त्यामुळेच त्यांच्या काळात पुण्यातील कॉंग्रेस भवनवर सातत्याने कार्यकर्ते , पदाधिकारी यांचा कायम राबता असे, परंतु आता बदलेल्या परिस्थितित कॉंग्रेस भवनची एवढी भव्य वास्तू एकदम ओस पडली आहे. पक्षाच्या छोट्या मोठ्या कार्यक्रमांना देखील गर्दी होत नाही, कारण कार्यकर्त्यांना पूर्वीचे कॉंग्रेस भवन हे आता आपलेसे वाटत नाही.

पुणे महापालिकेत देखील कॉंग्रेस पक्ष पार गाळात गेला आहे. दोन वर्षांवर महापालिका निवडणुका येउन ठेपल्या आहेत, त्यामुळे कॉंग्रेस पक्षाला पुणे शहरात आत्तापासूनच एका सक्षम आमदाराची गरज आहे आणि ही गरज अभय छाजेडच भरून काढू शकतील असा अंदाज लावला जात आहे. छाजेड हे अनेक वर्षे नगरसेवक देखील होते, तसेच पुणे शहरातील बुद्धीजीवी लोकांपासून ते व्यापारी वर्गापर्यंत तसेच झोपडपट्टीतील लोकांपर्यंत त्यांची कायम उठबस असते. अनेक सामाजिक संस्था, संघटना, बँका , पतसंस्था यांचे पदाधिकारी असलेले छाजेड यांचा राजकीय, सामाजिक क्षेत्राचा देखील चांगला अभ्यास आहे. गेले दोन तीन वर्षे केन्द्रीय पातळीवरुन मोठ्या व अभ्यासू नेत्यांना पुण्यात आणून त्यांची विविध विषयांवर व्याख्याने आयोजित करुन त्यांनी गरीबांबरोबरच नवमध्यमवर्ग व तरुणाई पुण्यात कॉंग्रेस पक्षाकडे कशी ओढली जाईल यासाठी प्रयत्न चालवले आहेत. रस्त्यावरील आंदोलने असो किंवा बुद्धीजीवी लोकांसाठी कार्यक्रम असो, ते नेहमीच सक्रिय असतात.

सध्या पुणे कॉंग्रेसमध्ये सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय , क्रीडा , प्रशासन अश्या सर्व क्षेत्रात उत्तम संपर्क असलेले अभय छाजेड हे गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणूकीसाठी देखील इच्छुक होते. परंतु त्यांना उमेदवारी मिळाली नाही तरी त्यांनी पक्षनिष्ठेने लोकसभा निवडणुकीत खूप चांगले नियोजन केले होते. तसेच आजवर पुणे शहर कॉंग्रेसमधील वरच्या फळीतील सर्वच नेत्यांना पक्षाने एकदा का होईना आमदारकीची संधी दिली आहे. परंतु छाजेड यांची क्षमता असूनही अद्याप त्यांना ही संधी मिळाली नाही, त्यामुळे येत्या विधानपरिदषदेच्या एका जागेवर अभय छाजेड यांना संधी मिळावी अशी मागणी जोर पकडत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!