Share

पेट्रोल पंपधारकांच्या मागण्या शासन दरबारी पोहोचवू : आ. सुभाष देशमुख 

Published On: 

सोलापूर : पेट्रोल पंपधारक आणि कर्मचारीही अत्यावश्यक सेवेत मोडत मोडतात. त्यामुळे आम्हालाही विमा संरक्षण द्यावे, पोलिसांनी पेट्रोल पंपावर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत यासह विविध मागण्या पेट्रोल पंपधारकांनी आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे कॉल कॉन्फरन्सद्वारे केल्या. दरम्यान या सर्व मागण्या आपण शासन दरबारी निश्चित पोहोचू असे आश्वासन आ. देशमुख यांनी दिले.

आ. देशमुख यांनी शुक्रवारी कॉल कॉन्फरन्सद्वारे शहर आणि जिल्ह्यातील पेट्रोल पंप धारकांशी संवाद साधला. यावेळी अनेक पेट्रोल पंपधारकांनी आम्हीही अत्यावश्यक सेवेत मोडत असल्यामुळे कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण द्यावे, पास असूनही अनेक कर्मचाऱ्यांना पेट्रोल पंपावर जाऊ दिले जात नाही याबद्दल प्रशासनास बोलावे, अनेक ग्रामपंचायतीने पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावर जाऊ नये असे पत्रक काढले आहे, याची शहानिशा करावी, पंपावर गर्दी झाली म्हणून अनेक पेट्रोल पंपावर गुन्हे दाखल केले आहेत ते मागे घ्याव्येत यासह अनेक मागण्या केल्या.

त्यावेळी अनेक पेट्रोल पंपधारकांनी आम्ही प्रशासनाला सहकार्य करत असून गरज भासेल तेव्हा गरीब लोकांना अन्नधान्य पुरवठा तसेच रुग्णवाहिकेला मोफत पेट्रोल देत असल्याचे सांगितले. कोरोनाच्या काळात पेट्रोल पंपधारक महत्त्वाची सेवा बजावत आहेत. त्यांच्या अडीअडचणी सोडवे सोडवणे आपले कर्तव्य आहे.

त्यांच्या सर्व मागण्या आपण निश्चित शासन दरबारी पोहोचवू असे यावेळी सुभाष देशमुख यांनी सांगितले. यावेळी अशोक लुणावत आनंद सादूल, अभय कांबळे, अमित कोरूलकर, अभिजीत गजगे, रामभाऊ मस्के यांच्यासह अनेक पेट्रोल पंप धारकांनी आमदार देशमुख यांच्याशी संवाद साधला.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!