Share

मास्क आणि सॅनिटायझरच्या मनमानी किंमतींवर चाप बसणार, राजेश टोपेंचा मोठा निर्णय

Published On: 

मुंबई : राज्यात मास्क आणि सॅनिटायझरचा वाढता वापर पाहता अनेक ठिकाणी या वस्तूंच्या किंमतीने उच्चांक गाठलेला दिसून आला आहे. मास्क आणि सॅनिटायझरसाठी कुठेही अवाजवी किंमत आकारली जाऊ नये म्हणून त्यावर कॅपिंग बसवण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य खात्याकडून घेण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. याआधी देखील खासगी रुग्णालयातील बेड चे दर, खासगी रुग्णवाहिका यांच्याकडून होणाऱ्या लुटमारीला आळा घालण्यासाठी त्यांच्या किमंतीवर कॅपिंग बसवण्यात आले आहे. अशाच प्रकारची कॅपिंग अन्न व औषध विभागाशी चर्चा करून मास्क आणि सॅनिटायझरवरही बसवण्यात येईल असे राजेश टोपे म्हणाले.

कोरोना रोखण्यासाठी बाळासाहेब थोरातांनी सुचावी ‘त्रिसूत्री’

त्यासोबतच जिल्हास्तरावर अधिकाऱ्यांना अँटीजन टेस्टला मान्यता देण्यात आली आहे. या टेस्टची किंमत ४५० रू. इतकी ठरवण्यात आली आहे. यातून जिल्ह्यात एखाद्या कंटेनमेंट झोनमध्ये किंवा खासगी रुग्णालयात अँटीजन टेस्ट करून अर्ध्या तासात रिपोर्ट घेता येऊ शकेल. अँटीजन टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास ती व्यक्ती कोरोनाबधित आहे हे निदान लावता येऊ शकेल इतके या टेस्टचे वैशिष्ट्य असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात पुन्हा कडकडीत लॉकडाऊन

दरम्यान, महाराष्ट्राचा एकूण विचार केला असता काल (5 जुलै) दिवसभरात 6 हजार 555 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 125 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 6 हजार 619 वर पोहचली आहे. यापैकी 8 हजार 822 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 11 हजार 740 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महाराष्ट्रात कोरोना विषाणूला आटोक्यात आणण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र या सोबत नागरिकांनी सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!