🕒 1 min read
मुंबई : विधानसभा 2019 नंतर राज्यात वेगळ्यापद्धतीचं राजकारण अनुभवायला मिळालं. महाराष्ट्रात पहिल्यांदा महाविकास आघाडीच्या रुपात राज्यातील जनता सत्ताकारण अनुभवत आहे. मात्र अधूनमधून या सत्ताकारणात काहींना काही वादळं निर्माण होताना पाहायला मिळतात. शिवसेना संसदीय नेते आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली आहे. संजय राऊत यांनीच याबाबत ट्वीटरवरुन याची माहिती दिलीय. लवकरच ही रंगलेली रोखठोक मुलाखत प्रसिद्ध होणार आहे.
धोका वाढला : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पुन्हा कडकडीत लॉकडाऊन
आतापर्यंत राऊत यांनी शिवसेना प्रमख बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घेतलेल्या मुलाखती चांगल्याच गाजल्या आहेत. सामनामधून या मुलाखती आल्यानंतर अनेकदा देशभर वादळं निर्माण झाली होती. राऊतांच्या बेधडक प्रश्नांना बाळासाहेबांनी दिलेली बेधडक उत्तरं चांगलीच गाजली होती.
आता सत्तास्थापनेनंतरची पहिली स्फोटक मुलाखत असेल. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेवेळी झालेल्या राजकीय घडामोडींचे खळबळ निर्माण करणारे गौप्यस्फोट या मुलाखतीतून होतील, असा दावा खुद्द संजय राऊत यांनी केला आहे. सामनामध्ये लवकरच या मॅरेथॉन मुलाखतीचे भाग प्रसिद्ध होणारेत. या मुलाखतीचे व्हिडीओही प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.
पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर गुन्हे दाखल करा, कृषीमंत्र्यांचे आदेश
‘देशाचे नेते मा.शरद पवार यांच्याशी आज दिलखुलास गप्पा झाल्या. ही जोरदार राजकीय मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल. लवकरच सामनात प्रसिद्ध होइल आणि वृत्त वाहिन्यांवर पहाता येईल. चीन पासून महाराष्ट्रातील घडामोडी पर्यंत जोरदार बोलले’. अस संजय राऊत यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलंय
देशाचे नेते मा.शरद पवार यांच्याशी आज दिलखुलास गप्पा झाल्या. ही जोरदार राजकीय मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल. लवकरच सामनात प्रसिद्ध होइल आणि वृत्त वाहिन्यांवर पहाता येईल..@PawarSpeaks चीन पासून महाराष्ट्रातील घडामोडी पर्यंत जोरदार बोलले. pic.twitter.com/pTdCKucP0n
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 6, 2020
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
