Share

शेतकऱ्यांचे नुकसान महामार्ग प्राधिकरणाकडून वसूल करणार; दुग्धव्यवसाय विकासमंत्र्यांचे आश्वासन

Published On: 

🕒 1 min read

वर्धा : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कामांमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होत आहे. यावर्षी या कामांमुळे जिल्ह्यातील एकही शेतकरी शेती करण्यापासून वंचित राहिल्यास किंवा त्याच्या पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांची नुकसान भरपाई राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून वसूल करण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री सुनील केदार यांनी दिला.

काल त्यांनी राष्ट्रीय महामार्ग 353 (i) च्या कामाची देऊळगाव, हमदापुर येथे भेट देऊन पाहणी केली. त्यांनी या महामार्गाच्या कामाची माहिती घेतली. प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत केदार बोलत होते.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण बनवत असलेले रस्त्याची उंची शेतकऱ्यांच्या शेतापासून 5 फुटापेक्षा जास्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ते बंद झालेले आहेत. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठीचे कंत्राटदाराने खराब केलेले रस्ते दुरुस्त करून द्यावेत. शेतात पडणारे पावसाचे पाणी आणि गावातील सांडपाणी वाहून जाण्यासाठी काय व्यवस्था केलेली आहे? गावाच्या रस्त्यावरील काढलेले पथदिवे कुठे आणि कधी लावणार? राष्ट्रीय महामार्गवर अपघातस्थळे कुठे व किती आहेत? त्यावर काय उपाययोजना केल्यात? महामार्गावरील गावाजवळ येणाऱ्या चौफुली किती आहेत आणि त्यावरील उपाययोजना याची सविस्तर माहिती सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्यात.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 (i) या रस्त्यांचे काम मार्च 2020 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश होते. मात्र 18 महिन्यात केवळ 10 टक्केच काम कंत्राटदाराने केले असताना त्यांना मुदतवाढ कोणत्या आधारे देण्यात आली. या कामासाठी नेमण्यात आलेल्या सल्लागारांनी काय अहवाल पाठवला याची माहिती सादर करण्यात यावी. रस्ता वेळेत पूर्ण न करण्याऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी महामार्ग अधिकाऱ्यांना दिल्यात. तसेच बुटीबोरी तुळजापूर महामार्गावरील वर्धा जिल्ह्यातील प्रवेश गांधी जिल्ह्याला शोभेल अशापद्धतीने करण्यात यावा अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्यात. यावेळी महामार्ग प्राधिकरण नागपूर विभागाचे कार्यकारी अभियंता बोरकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

उच्चशिक्षित तरुणांसाठी खुशखबर ! उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतांनी दिली ‘ही’ माहिती

नितीन गडकरींच्या आदेशानुसार पाहणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांची झाली फजिती

कृषी पंपांसाठीचे नवीन वीज जोडणी धोरण लवकरच – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!