Share

‘हा’ कारखाना देणार दहा दिवसांत एफआरपीची रक्कम

Published On: 

उमरगा : मागील हंगामात कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्याच्या कामामुळे कारखाना सुरू होण्यास विलंब झाला, तरीही दोन हजार शंभर रुपये भाव देण्यात आला. चालू हंगामात एफआरपीप्रमाणे दहा दिवसांत ऊस देयकाची रक्कम दिली जाईल. यावर्षी ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांना पुढील वर्षीच्या हंगामात विशेष प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी दिली.

समुद्राळ (ता. उमरगा) येथील भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्यावर क्विनर्जी इंडस्ट्रीजच्या 2019 च्या गाळप हंगामाच्या प्रारंभप्रसंगी प्रा. बिराजदार बोलत होते. यावेळी क्विनर्जी इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी संचालक सचिन सिनगारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. बिराजदार पुढे म्हणाले, की उमरगा, लोहारा तालुक्यांतील उसाची मोठ्या प्रमाणात लागण असूनही मागील वीस वर्षांमध्ये शेतकऱ्यांचे अतोनात हाल झाले आहेत. त्यामुळेच या साखर कारखान्याची उभारणी करण्यात आली आहे. कारखाना चालू करण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध होऊ शकत नसल्यामुळे संचालक मंडळाने कारखाना क्विनर्जी इंडस्ट्रीज लिमिटेड (पुणे) या आर्थिकदृष्ट्या सक्षम व अनुभवी कंपनीला भाडेतत्त्वावर दिला आहे. याचा फायदा ऊसउत्पादकांना होत आहे.

भविष्यामध्ये उपपदार्थ निर्मिती करण्याचा कारखान्याचा मानस आहे. सदरील कंपनी सक्षम असल्याने उसाला चांगला भाव मिळण्याची खात्री आहे. यावर्षी एफआरपीप्रमाणे दोन हजार 351 रुपये भाव असून, कारखान्याकडून यापेक्षा चांगला भाव दिला जाईल. शेतकरी सभासदांनी चांगल्या प्रतीचा ऊस पुरवठा करून सहकार्य करावे, असे आवाहन प्रा. बिराजदार यांनी केले.

यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष पद्माकर हराळकर, संचालक सुनील माने, राहुल पाटील, युवराज कदम, साहेबराव पाटील, व्यंकटराव सोनवणे, राजेंद्र माने, इमाम पटेल, गोविंदराव साळुंके, योगिराज स्वामी, पंडितराव आळंगे, किसन पाटील, माणिकराव बिराजदार, गोविंदराव पवार, किशोर साठे, बाबा जाफरी, सरपंच रणजित गायकवाड, शमशोद्दीन जमादार, राम जाधव, नेताजी कवठे, दत्ता इंगळे यांच्यासह सभासद, ऊसउत्पादक शेतकरी उपस्थित होते. कारखान्याचे मुख्य अभियंता जितेंद्र मेटकरी, भाऊसाहेब खरात, मुख्य लेखापाल बी. जे. पाटील उपस्थित होते. कारखान्याचे महाव्यवस्थापक संजय गुरव यांनी सूत्रसंचालन केले. शेतकरी बाळासाहेब स्वामी यांनी आभार मानले.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1199243158065827840?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1199240351212437505?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!