🕒 1 min read
मुंबई : कोरोनामुळे राज्यात गेली दीड महिना सगळी दारूची दुकाने बंद ठेवण्यात आली होती. यामध्ये सरकारचा खूप सारा महसूल बुडत होता. याचमुळे अर्थव्यव्यवस्थेला देखील मोठा फटका बसला होता.
याच पार्श्वभूमीवर दारूची दुकाने सुरू करून घसरलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा रूळावर आणण्याचे प्रयत्न शासनाने केले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरासाठी तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाउन जाहीर झाले आहे. लॉकडाउन 3.O मध्ये केंद्र आणि राज्य शासनाने झोननिहाय काही शिथिलता जाहीर केली आहे. मात्र, नागपूर शहर हे ‘रेड झोन’ मध्ये असल्या कारणाने इथं कुठलंही शिथिलता राहणार नाही, असं नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढेंनी स्पष्ट केलं.
लॉकडाउन -3 मध्ये मुंबई, पुणे शहरासाठी जे नियम लागू आहेत तेच नियम नागपूर शहरासाठी लागू राहतील. त्यामुळे नागरिकांनी कुठलाही संभ्रम ठेवू नये, असंही मुंढे यांनी स्पष्ट केलं. तसेच वाईन शॉप किंवा अन्य कुठलीही दुकाने नागपूर महानगरपालिका हद्दीत सुरू होणार नाहीत, असे आदेशात नमूद केले आहे.


