Share

पुणे विभागात कोरोना बाधित 1085 रुग्ण – विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

Published On: 

पुणे : विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1085 झाली असून विभागात 181 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 831 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 73 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 38 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

विभागात 1085 बाधित रुग्ण असून 73 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 985 बाधीत रुग्ण असून 67 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 21 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 41 बाधीत रुग्ण असून 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 28 बाधीत रुग्ण असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात 10 बाधीत रुग्ण आहेत.

आजपर्यंत विभागामध्ये एकूण 12 हजार 755 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 12 हजार 86 चा अहवाल प्राप्त आहे. 669 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 10 हजार 939 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 1 हजार 85 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

आजपर्यंत विभागामधील 49 लाख 58 हजार 977 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्या अंतर्गत 1 कोटी 91 लाख 16 हजार 464 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 989 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!