🕒 1 min read
Jitendra Awhad |मुंबई : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांनी ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटाचे ठाणे जिल्ह्यात प्रदर्शन रोखले. यावेळी प्रेक्षकांना मारहाण झाल्याची देखील चर्चा आहे. ‘हर हर महादेव’ चित्रपटाला महाराष्ट्रात मोठा विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी फेसबूकवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मराठ्यांच्या इतिहासाचा विपर्यास कुठल्या हेतूने केला. शिवाजी महाराज विरुद्ध बाजीप्रभू देशपांडे हे महाराष्ट्र पचवेल?, असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला.
जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये ‘हर हर महादेव’ चित्रपटावर टीका केली. “हर हर महादेव, या सिनेमात तर विकृतीचा एक वेगळाच कळस गाठला गेला. बाजीप्रभू देशपांडे चक्क महाराजांचे एकेरी नाव घेत त्यांच्याशी युद्ध करत आहेत. एका स्वामीनिष्ठ मावळ्याचा हा केवढा अपमान आहे! या सिनेमात बाजीप्रभू ही व्यक्तिरेखा खुद्द महाराजांपेक्षाही मोठी दाखवली आहे. महाराजांना प्रत्येक गोष्ट जणू काही बाजीप्रभूच शिकवत होते आणि महाराजांना, जिजाऊंना किंवा इतर दरबारी लोकांना काहीच माहीत नव्हते इतक्या दर्जाचा हा विपर्यास आहे. अफजलखानाचे पोट फाडताना महाराज खानाला मांडीवर घेतात, का तर महाराज हे नृसिंहअवतार वगैरे आहेत असे सुचवायचे आहे,” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
हा नक्कीच सनातनी कावा-
‘शेर शिवराज’ सिनेमात महाराजांना स्वप्न पडते ज्यात देवी भवानी त्यांना येवुन सांगते की ती खानाने तिचा अपमान केला आहे आणि ती खानाचा बदला महाराजांच्या माध्यमातून घेईल. थोडक्यात, दोन्ही सिनेमात महाराजांनी खानाचा केलेला वध हा फक्त दैवी शक्तीने घडला होता आणि त्यात महाराज फक्त निमित्तमात्र होते हाच संदेश आहे. महाराजांच्या व मावळ्यांच्या युद्धनीतीला, शौर्याला दैववादाच्या पायाशी लोळण घेताना दाखवणे हा नक्कीच सनातनी कावा असल्याचे देखील आव्हाड म्हणाले.
पावनखिंड, तान्हाजी चित्रपटावर देखील जितेंद्र आव्हाडांनी भुमिका स्पष्ट केली-
जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘तान्हाजी’ या हिंदी सिनेमात तान्हाजी मालुसरे थेट नृत्य करताना दिसतात, साधूच्या नकली वेशात ते चक्क शिवाजी महाराजांना सुनावतात, चक्क जिजाऊंना कोंढाण्यावरून हुसकावून लावताना दाखवले जाते जे इतिहासात कधीही घडले नाही. या सिनेमात उदेभान हा मुघलांच्या बाजूने लढणारा राजपूत सरदार मात्र मुसलमानाच्या वेशात दाखवला जातो कारण मुस्लिमांप्रती द्वेष वाढवणे हा सनातनी अजेंडा राहतोच. ऐतिहासिक चुकांनी भरलेला हा सिनेमा यशस्वी झाला आणि सनातनी लोकांचा हुरूप अजुन वाढला. “पावनखिंड” या सिनेमात बाजीप्रभू देशपांडे एखाद्या ठिल्लर मवाल्यासारखे मुघल सरदाराला “चल” असे म्हणतात तर “हर हर महादेव” सिनेमात बाजीप्रभू “घंटा!” अशी टपोरी भाषा वापरताना दिसतात. पावनखिंड सिनेमात बाजीप्रभूंच्या घरातील विधवा स्त्रिया चित्पावन विधवा नेसायच्या ते आलवण नेसताना दिसतात, जेव्हा की बाजीप्रभू हे चित्पावन ब्राम्हण नव्हते तर कायस्थ होते. “सरसेनापती हंबीरराव” या सिनेमात हंबीरराव एका मुघल सरदारासोबत डायलॉगबाजी करत मैत्रीपूर्ण कुस्ती करत आहेत, आणि कडेने मावळे प्रोत्साहन देत आहेत. खुद्द महाराज, जिजाऊ, तान्हाजी, बाजीप्रभू, हंबीरराव यांच्या नावाने काहीही खपवून नेमके काय साध्य करायचे आहे हा चिंतनाचा विषय आहे.
महत्वाच्या बातम्या :
- iPhone 14 Price | iPhone 14 मिळत आहे 7 हजार रुपयांनी स्वस्त, कसा? ते जाणून घ्या!
- Amol Mitkari | “… म्हणून अब्दुल सत्तारांनी कुत्रा ‘ही’ निशाणी मागितली होती”, अमोल मिटकरी सत्तारांवर कडाडले
- Jitendra Awhad | “महाराजांना ब्राम्हणशाहीच्या अधीन असणारा एक मुस्लिमद्वेष्टा राजा अशा रूपात दाखवले गेले ” ; जितेंद्र आव्हाडांची पोस्ट
- MNS । “आव्हाड हे अफझल खानाचे प्रवक्ते”; मनसेचा जोरदार हल्लाबोल
- Lunar Eclipse | आज दिसणार वर्षातले शेवटचे चंद्रग्रहण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

