🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: मृदा आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. म्हणूनच लोकांना मातीचे महत्त्व सांगण्यासाठी, मातीच्या गुणवत्तेची जाणीव आणि मातीच्या संवर्धनाची जाणीव करून देण्यासाठी दरवर्षी 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन (World Soil Day) साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय संस्था आज जागतिक मृदा दिन साजरा करतात. मृदा संवर्धन आणि शाश्वतेकडे व्यवस्थापनाचे लक्ष जावे या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. पर्यावरणाच्या होणाऱ्या हानीमुळे दिवसेंदिवस मातीवर दुष्परिणाम होत चालले आहे. त्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आज अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम योजले जातात.
कधीपासून साजरा केला जातो जागतिक मृदा दिवस (World Soil Day)?
इंटरनॅशनल युनियन ऑफ सोईल सायन्स (IUSS) यांनी 2022 मध्ये 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. हा दिवस साजरा करण्याचे मुख्य कारण म्हणजे लोकांना बिघडलेल्या मातीच्या स्थितीबद्दल जागरूक करणे होते. त्याचबरोबर लोकांनी मातीच्या संवर्धनाकडे लक्ष द्यावे म्हणून देखील हा प्रश्न मांडण्यात आला होता. यानंतर अन्न आणि कृषी संघटनेकडून 2013 मध्ये 68 व्या संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये जागतिक मृदा दिन साजरा करण्यासाठी आग्रह करण्यात आला होता. शेवटी सभेने 2014 मध्ये 5 डिसेंबर हा पहिला अधिकृत जागतिक मृदा दिवस म्हणून घोषित केला. तेव्हापासून 5 डिसेंबर हा दिवस जागतिक मृदा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
जागतिक मृदा दिवस साजरा करण्याचा उद्देश
पर्यावरणासाठी आणि निसर्गचक्रासाठी मातीचा ऱ्हास होणे हा एक मोठा धोका आहे. जागतिक स्तरावर ही एक मोठी समस्या मानली जाते. म्हणून 5 डिसेंबर हा दिवस माती संबंध समस्या, त्यातली आव्हाने, मातीचे संवर्धन इत्यादी गोष्टीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो.
जागतिक मृदा दिन 2022 थीम
युनायटेड नेशन्स अनुसार, यावर्षीची जागतिक मृदा दिनाची थीम आहे ‘सॉईल: वेअर फुड बिगीन’ म्हणजेच मातीची एक अशी गोष्ट आहे जिथे अन्न मिळायला सुरुवात होते. माती व्यवस्थापनातील वाढती आव्हाने सोडवण्यासाठी आणि मातीबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच मातीमध्ये योग्य प्रकारे सुधारणा होण्यासाठी लोकांना मिळावे म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो.
महत्वाच्या बातम्या
- Electric Scooter | ‘या’ आहेत टॉप इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
- PM Kisan Yojana | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात येईल PM किसान योजनेचा 13 वा हप्ता
- Diabetes | डायबिटीसपासून आराम मिळवण्यासाठी आहारात ‘या’ भाज्यांचा करा समावेश
- Rupali Patil | “प्रसाद लाड यांची जीभ…”; शिवरायांवरील विधानावरून रुपाली पाटील आक्रमक
- Sambhajiraje Chhatrapati | प्रसाद लाड यांच्या विधानावरून संभाजीराजेंची आक्रमक भूमिका; फडणवीसांचे नाव घेत म्हणाले, “जमत नसेल तर…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

