Share

पवार, फडणवीसांनंतर आता आठवले निघाले कोकण दौऱ्यावर

Published On: 

मुंबई : निसर्ग वादळाने नुकसानग्रस्त झालेल्या कोकणचा पाहणी दौरा उद्या (शुक्रवार दि.12 जून) रोजी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले करणार आहेत. या कोकण दौऱ्यात रायगड मधील माणगाव, रत्नागिरीतील मंडणगड, दापोली या तालुक्यांतील नुकसानग्रस्त गावांचा दौरा करणार आहे.

निसर्ग वादळग्रस्त कोकण पाहणी दौऱ्यात दि. 12 जून रोजी सकाळी मुंबईहून मंडणगड कडे रामदास आठवले रवाना होणार असून सर्वप्रथम महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळगावी आंबडवे येथे रामदास आठवले भेट देऊन वादळाने झलेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. मंडणगड तालुक्यातील सावरी, पचारळ, दापोलीला भेट देणार आहेत. त्यांनंतर रायगड मधील माणगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांना भेट देणार आहेत. अशी माहिती रिपाइं तर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या परीक्षांच्या बाबतीत पवारांनी केलेला दावा खोटा ?

दरम्यान, मागील आठवड्यात आलेल्या निसर्ग वादळाने कोकण किनारपट्टीलगतच्या गावांचं, शेतीचं किती नुकसान झालं आहे. या वादळाने नुकसान केलेल्या भागाचे आता विविध पक्षाचे नेते दौरे काढत आहेत. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील कोकण दौऱ्यावर जाऊन आले आहेत.

आता माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे 11 आणि 12 जून असे दोन दिवस कोकणाचा दौरा करणार आहेत. या दोन दिवसांत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत विविध ठिकाणी ते भेटी देऊन नुकसानीची पाहणी करतील.

‘राजू शेट्टी सारख्या लोकनेत्याने कुणाच्याच आडोश्याला जाऊ नये’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!