मुंबई : ठाकरे सरकारची ‘मुघलराज’शी तुलना करणाऱ्या ३० वर्षीय व्यक्तीविरोधात मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूरचा रहिवासी असलेल्या समीत ठक्कर याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका करत सरकारच्या कामकाजावर ताशेरे ओढले होते. शिवसेनेचे कायदेशीर सल्लागार धरम मिश्रा यांनी समीर ठक्करविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. टाइम्स ऑफ इंडियाने यासंबंधी वृत्त दिलं आहे.
धरम मिश्रा यांनी आपल्या तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, ठक्कर याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा जून आणि जुलै महिन्यात फोटो शेअर केला होता. यावेळी त्याने त्यांची तुलना मुघल राजशी केली होती. त्याने नितीन राऊत यांच्यावरही आक्षेपार्ह टीका केली होती.
या वादग्रस्त ट्विटमध्ये त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख हा नव्या काळातील औरंगजेब असा केला असून आदित्य ठाकरे यांना मोहम्मद आझम शाह उर्फ बेबी पेंग्विन असंहि म्हटलं आहे.त्यामुळे ट्विटरला सध्या #BabyPenguin हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. समीत ठक्कर याच्यावर तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला आहे. आतापर्यंत हा हॅशटॅग वापरून हजारो ट्वीट झाले आहेत.
@AUThackeray @priyankac19#BabyPenguin pic.twitter.com/KtUOxdBseY
— Tushar Chaudhari ???????????? (@im_Tushar_Hindu) July 16, 2020
https://twitter.com/himanshu_surya7/status/1283719567253143552?s=20
आज के #BabyPenguin ट्रेंड को देख कर कुछ लोगों की हालत ????????????
आज कितनों को Block किया होगा?? pic.twitter.com/hhWrRFlzMl
— Swanand Gangal (Cartoonist) (@swanandgangal) July 16, 2020
????????????????#BabyPenguin https://t.co/V05t3y00Aw
— RAGHAV ????????(Modi Ka Parivar) (@yapragun) July 16, 2020
महत्वाच्या बातम्या-
संजय राऊत, सुशांत सुशांत सिंह राजपूतला ‘हा’ रोल करणार होते ऑफर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गृहमंत्र्यांप्रमाणे रझा अकादमीची पाठराखण करतात का?
आघाडीत बिघाडी : सरकार आघाडीचे आहे याची काळजी घ्या, राहुल गांधींच्या खास व्यक्तीने खडसावले
ठाकरे सरकारची ‘मुघलराज’शी तुलना, मुंबईत गुन्हा दाखल

