मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप गाजत आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. राज्यपालांना भेटल्यानंतर महाविकास आघाडी सरकार अस्थिर आहे असे भाजपने सांगितले आहे.
राज्यपालांच्या भेटीनंतर भाजपतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी, भाजपचे अनेक नेतेमंडळी उपस्थित होते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर भाष्य करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काहीच का बोलत नाहीत? असा सवाल उपस्थित केला आहे.
‘सध्या राज्यात ज्या प्रकारच्या घटना बाहेर येत आहेत त्या चिंताजनक आहे. या पेक्षा चिंताजनक म्हणजे मुख्यमंत्र्याचे मौन आहे. राज्याचे प्रमुख या नात्यानं मुख्यमंत्र्यांनी बोललं पाहिजे राज्यात घडत असलेल्या घटनांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे का बोलत नाही ?’ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
पुढे ते म्हणाले, ‘राज्य सरकारमध्ये नैतिकता उरली नाही. मुख्यमंत्री या प्रकरणांवर काही बोलत नसतील तर राज्यपालांनी त्यांना बोलतं केलं पाहिजे. राज्यपालांना भेटून आम्ही मागणी केली की, राज्याचे घटनात्मक प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांकडून अहवाल घेतला पाहिजे.’
महत्वाच्या बातम्या
- ‘तो लवंगी फटाका होता, तर तुम्ही एवढे का घाबरले?’
- वयाने, अनुभवाने, संपत्तीने एवढे मोठे आहात थोडं खरं बोलायला शिका; अमृता फडणवीसांचा पुन्हा प्रहार
- मोठी बातमी : काँग्रेसनेच केला शिवसेनेवर ८०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
- प्राजक्ता गायकवाडच्या क्युट कॉस्ट्यूम डिझायनरला पाहिलंत का?
- तांत्रिकदृष्ट्या जरी नरेंद्र पाटील सेनेत असले तरीही ते मनाने मात्र भाजपसोबत होते ?

