Share

…आता कोकणातले पोपट गप्प का, शिवसेनेची बोचरी टीका

Published On: 

मुंबई : संपूर्ण देशाचे लागून राहिलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्तेत येणार हे निश्चित आहे. ममतांना पराभूत करण्यासाठी या निवडणुकीत भाजपने आपली संपूर्ण प्रचारयंत्रणा आणि दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवले होते. त्यामुळे ममतांसाठी ही निवडणूक अस्तित्त्वाची लढाई झाली होती. हे आव्हान स्विकारत ममता बॅनर्जी भाजपसमोर ठामपणे उभ्या राहिल्या होत्या.

आतापर्यंतच्या निकालाचा कल पाहता तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये सहजपणे सत्तास्थापन करेल, असे दिसत आहे. तर ‘अब की बार 200 पार’ च्या वल्गना करणारा भाजप १०० जागांचा टप्पाही ओलांडेल की नाही, याबाबत शंका आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपच्या दणदणीत पराभवाची चिन्हं दिसू लागल्यानंतर आता महाविकासआघाडीच्या नेत्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. पश्चिम बंगालचा निकाल समोर आल्यानंतर आता भाजपचे ‘कोकणातले पोपट’ गप्प का बसलेत, असा टोला शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी लगावला. त्यांच्या या टीकेचा रोख भाजप नेते नारायण राणे आणि त्यांच्या मुलांच्या दिशेने असल्याची चर्चा आहे.

अरविंद सावंत यांनी काही वेळापूर्वी माध्यमांशी सवांद साधला होता. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली. या दोन नेत्यांच्या हट्टामुळे संपूर्ण देश सरणावर गेला. भाजपने बंगालमध्ये गर्दी जमवली. मग आता भाजपचे सगळे पोपट गप्प का बसलेत? कोकणातले पोपट गप्प का, असा सवाल अरविंद सावंत यांनी उपस्थित केला. काही पोपट नुसतेच बोलतात. त्यांना आता बोलणेही मुश्किल होईल. लोक त्यांना फिरु देणार नाहीत, असे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभेच्या मतमोजणीचा निकाल जसजसा पुढे सरकताना दिसत आहे तसतसे भाजपचे ग्रह फिरताना दिसत आहेत. कारण काहीवेळापूर्वीच नंदीग्राम मतदारसंघात पिछाडीवर असलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अखेर सुवेंदू अधिकारी यांना मागे टाकले आहे. आता सुवेंदू अधिकारी १४१७ मतांनी पिछाडीवर पडले आहेत. तर दुसरीकडे राज्यभरात तृणमूल काँग्रेसची जोरदार घोडदौड सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!