टीम महाराष्ट्र देशा: आयपीएल २०१९ चा आज पहिला सामना. हा सामना भारताचा आजी आणि माजी कर्णधार यांच्यात खेळला जाणार. म्हणजेच माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई आणि वर्तमान कर्णधार विराट कोहलीच्या बेंगलोर संघामध्ये. या सामन्याचा विचार करता चेन्नईचं पारडं थोडंस जड आहे. चेन्नईच्या संघात कर्णधार धोनीसह जडेजा, रैना, ब्राव्हो, रायडू, केदार जाधव, हरभजन,शार्दुल ठाकूर, असे दिग्गज आणि अनुभवी खेळाडू आहेत.
बेंगलोर संघाचा विचार करता या संघात नवख्या खेळाडूंचा समावेश आहे. विराट कोहली व एबी डिविलियर्स सोडता अनुभवी फलंदाजांची कमतरता आहे. गोलंदाजीतही चहल, उमेश यादव व टीम साऊथी सोडता फारसा अनुभव दिसत नाही. आजच्या सामन्यात अंबाती रायडू, सुरेश रैना, धोनी यांना रोखण्याचं आवाहन बेंगलोरच्या गोलंदाजांसमोर असणार आहे. तर चेन्नईचे गोलंदाज विराट कोहली व एबी डिविलियर्स यांना रोखण्याचा प्रयत्न करतील.
नवख्या खेळाडूंचा भरणा असल्याने बेंगलोर संघात नवीन चैतन्य आहे. आजच्या सामन्यात अनुभवी व अनुभवहीन खेळाडूंत होणारी टक्कर पाहण्याजोगी ठरणार आहे. खरतर क्रिकेट मध्ये जो संघ उत्कृष्ट खेळ करतो तोच विजयी ठरतो. आजही जो संघ मैदानावर आपला सर्वोत्कृष्ट खेळ करेल तोच विजयी ठरणार आहे. तरीही आजच्या सामन्यात चेन्नईचा संघ वरचढ ठरण्याची शक्यता आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

