🕒 1 min read
हैदराबाद : कोरोनावर मात करण्यासाठी अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेल्या जनता लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहे. मात्र, एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
अनेक राज्यांमध्ये लसींचा तुटवडा जाणवत असल्याने विविध लस भारतात आयात करण्यासाठी आता केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. या पार्श्वभूमीवर रशियन बनावटीची स्पुटनिक व्ही ही कोरोना प्रतिबंधक लस १ मे रोजी भारतात दाखल झाली आहे. या लसीच्या वापराला हिमाचल प्रदेशच्या कसौली येथील केंद्रीय औषध प्रयोगशाळेकडून नियामक मंजुरी मिळाली आहे.
तर, अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आज हैद्राबाद येथे पहिला डोस देण्यात आला आहे. भारतात स्पुटनिक लस आयात करणाऱ्या डॉ. रेड्डींज लेबोरेटरीने याबाबत माहिती दिली. हैदराबादमध्ये कस्टम फार्माचे ग्लोबल हेड दीपक सप्रा यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. दरम्यान, या लसींची विक्री पुढील आठवड्यापासून सुरु होईल, अशी माहिती निती आयोग सदस्य डॉ. व्ही के पॉल यांनी दिली आहे.
First doses of #SputnikV administered in India. On the picture Deepak Sapra, Global Head of Custom Pharma Services at @drreddys Laboratories is getting a shot of Sputnik V in Hyderabad. ✌️ pic.twitter.com/iBbTeB2DmT
— Sputnik V (@sputnikvaccine) May 14, 2021
स्पुटनिक च्या एका डोसची किंमत किती ?
स्पुटनिक लसीची किंमत आज जाहीर करण्यात आली आहे. भारतात या लसीच्या एका डोसची किंमत ९४८ रुपये इतकी ठरवण्यात आली असून त्यात अधिक ५ टक्के जीएसटी देखील द्यावा लागणार आहे. म्हणजेच या डोसच्या एका लसीसाठी एकूण ९९५ रुपये मोजावे लागणार आहेत. स्पुटनिक लस आयात करणारी कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने ही माहिती दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- महाडिकांची सत्ता पालटणाऱ्या पाटलांना बक्षीस; थेट गोकुळच्या अध्यक्षपदी लागली वर्णी !
- ‘अजित पवारांमुळे पुण्याची आर्थिक स्थिती इतकी बिकट की पुढील पुढील दहा वर्षे…’
- ‘कुठून हे नग मिळतात?’, माजी मुख्यमंत्र्यांवर जितेंद्र आव्हाड संतापले
- साखर कारखाना निर्माण करणार ऑक्सिजन ! देशातील पहिल्याच प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन
- भाजपचे खासदार असताना नाना पटोलेंचे फोन टॅप ; पटोलेंचा भाजपवर घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

